सचिन बनसोडे
Shirdi News : राज्य सरकारचा 'शासन आपल्या दारी' कार्यक्रम आज अहमदनगरच्या शिर्डीमध्ये पार पडत आहे. या कार्यक्रमात बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या कामांची माहिती नागरिकांना दिली. कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री अजित पवार, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, पालकमंत्री राधाकृष्ण विखे उपस्थित आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी विरोधकांवरही सडकून टीका केली. राज्यात आज एक मजबूत सरकार आहे. तरीही काही लोक दिवसा स्वप्न पाहत आहे. सांगतात की, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा लक्ष मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर आहे. हो आमची नजर मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीकडे आहे पण त्या खुर्चीच्या रक्षणासाठी आमचं त्याकडे लक्ष आहे. आमच्या मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्यांना जागा दाखवू, असा इशाराही यावेळी फडणवीसांना विरोधकांना दिला. (Political News)
आमचे मुख्यमंत्री २४ तास काम करणारे मुख्यमंत्री आहे. एकनाथ शिंदे एक संवेदनशील मुख्यमंत्री आहेत. आमच्या तिघांच्या कॉम्बिनेशनला तोड नाही. राष्ट्रीय नेते काल म्हणाले देवेंद्र फडणवीस म्हणाले की मी पुन्हा येईल मात्र आले नाही. मी पुन्हा आलो होतो पण काही लोकांनी गद्दारी केली. मात्र आम्ही आता त्यांचा पक्षच घेऊन आलो, असंही फडणवीस यांनी म्हटलं.
राज्यात पाऊस कमी पडला आहे. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आहे. मात्र सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाहीही देवेंद्र फडणवीसांना दिली. (Maharashtra News)
शासन आपल्या दारी उपक्रमामुळे काहींच्या पोटात मळमळ होत आहे. आमचे सरकार बंद दाराआड बसणारे नाही, असा टोलाही फडणवीसांना उद्धव ठाकरे यांना लगावला.
सरकारने घेतलेल्या अनेक निर्णयांची माहितीही त्यांनी यावेळी दिली. मुख्यमंत्र्यांनी माता भगिनींसाठी एसटी प्रवासात 50 टक्के सवलतीची योजना आणली. एकही लाभार्थी घरकुल योजनेपासून वंचित राहणार नाही, असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.