Ajit Pawar News: 'मोदींशिवाय पर्याय नाही; त्यामुळे काहींच्या पोटात दुखायला लागलं..' अजित पवारांची 'इंडिया' आघाडीवर खोचक टीका

Shasan Aplya Dari Shirdi: शिर्डीच्या काकडी गावात आज शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे, या कार्यक्रमात अजित पवार बोलत होते.
Ajit Pawar Sharad PAwar
Ajit Pawar Sharad PAwarSaam TV
Published On

सचिन बनसोडे, प्रतिनिधी...

Shirdi News: गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकारचा शासन आपल्या दारी कार्यक्रमाची चांगलीच चर्चा होत आहे. काही दिवसांपूर्वीच जेजुरीमध्ये का कार्यक्रम पार पडला होता. त्यानंतर आज ( १७, ऑगस्ट) शिर्डीमध्ये हा कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी या उपक्रमाचे कौतुक केले, तसेच राजकीय नेत्यांकडून वारंवार महापुरूषांविषयी होणाऱ्या अपमानजनक वक्तव्यांबद्दलही त्यांनी खबरदारी घेण्याचे आश्वासन दिले.

Ajit Pawar Sharad PAwar
Bharat Gogawale on CM Shinde : एकनाथ शिंदे साहेब एकट्याच्या जीवावर मुख्यमंत्री नाहीत, भरत गोगावलेंच्या वक्तव्याची चर्चा

काय म्हणाले अजित पवार?

शिर्डीत (Shirdi) आज 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. शिर्डीच्या काकडी गावात हा कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, "भाजपसोबत (BJP) आल्याने आम्ही शाहू - फुले आंबेडकांच्या विचारांपासून आम्ही किंचितही दूर गेलो नाही. या देशात महापुरुषांचा आदर केलाच पाहिजे. त्याबद्दल कुणीही बेताल वक्तव्य करू नये, याची खबरदारी आमच्याकडून घेतली जात आहे"

इंडिया आघाडीवर टीका...

या कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी "मोदींशिवाय देशात दुसरा पर्याय नाही, म्हणूनच त्यांच्या विरोधात खिचडी तयार झाली आहे. जगाने मोदींचे नेतृत्व मान्य केले आहे त्यामुळे काहींच्या पोटात दुखायला लागलं.." असे म्हणत इंडिया (India) आघाडीवर टीका केली. तसेच "तुम्ही महायुतीला साथ द्या, तुमच्या विश्वसाला तडा जाऊ देणार नाही..." असे आव्हानही त्यांनी यावेळी केले.

Ajit Pawar Sharad PAwar
Bharat Gogawale on CM Shinde : एकनाथ शिंदे साहेब एकट्याच्या जीवावर मुख्यमंत्री नाहीत, भरत गोगावलेंच्या वक्तव्याची चर्चा

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुख्यमंत्री बदलणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या आजारपणाचे कारण पुढे करत त्यांची सुट्टी होणार असल्याचे विधान कॉंग्रेस नेत्यांनी केले होते. यावर बोलताना अजित पवार यांनी मुख्यमंत्री आजारी असल्याने आराम करत होते तर काय वावड्या उठल्या? कुठे फेडाल हे पाप.. असे म्हणत विरोधकांवर निशाणा साधला. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com