Nashik Crime News: नाशिक पुन्हा हादरलं! भरदिवसा धारदार शस्त्राने वार करुन युवकाची हत्या; परिसरात खळबळ

Nashik Latest News Update: वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Nashik Crime News
Nashik Crime NewsSaam tv
Published On: 

अजय सोनावणे; प्रतिनिधी...

Nashik Crime News: राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. दोन दिवसांपूर्वी नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरात पत्नी आणि मुलांकडून ३९ वर्षीय व्यक्तीची हत्या करण्यात आली होती. ही घटना ताजी असतानाच नाशिकच्या मालेगावमधून एक धक्कादायक प्रकरण समोर आली आहे.

मालेगावमध्ये भरदिवसा ४० वर्षीय युवकाचा खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.

Nashik Crime News
Palghar News: दुर्देवी! रुग्णालयात जाण्यासाठी रस्ता नसल्याने उपचाराअभावी २ महिन्याच्या बाळाचा मृत्यू; नागरिकांमधून संताप

याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिकच्या (Nashik) मालेगावमधील (Malegaon) सोयगाव भागातील इंदीरानगर भागात भर दिवसा वर्दळीच्या रस्त्यावर एका ४० वर्षीय युवकाचा खून झाल्याने खळबळ उडाली आहे .सुनिल बाजीराव गुंजाळ असे खून झालेल्या व्यक्तीच नाव आहे. अज्ञात व्यक्तीने दुपारच्या सुमारास धारदार हत्यारांनी त्याच्यावर वार केले. ज्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला.

भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी ही भयंकर घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाची पाहणी केली. दरम्यान खुनाचे कारण अद्याप समोर आले नसून पोलिस अधिक तपास करीत आहेत. (Latest Marathi News)

Nashik Crime News
Nitin Deshmukh on Chandrashekhar Bawankule: 'बावनकुळे मतिमंद', उद्धव ठाकरेंवरील टीकेवर नितीन देशमुख संतापले

पतीकडून पत्नीची हत्या...

दरम्यान, छत्रपती संभाजीनगरमधूनही (Chhatrapati Sambhajinagar) अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दारू आणि गांजाचे व्यसन असलेल्या पतीने बॅट आणि चाकूने वार करत पत्नीचा खून (Crime News) केल्याची घटना कांचनवाडी परिसरात घडली आहे. या निर्घृण हत्येच्या घटनेने (Sambhaji nagar) परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Breaking Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.