Palghar News: दुर्देवी! रुग्णालयात जाण्यासाठी रस्ता नसल्याने उपचाराअभावी २ महिन्याच्या बाळाचा मृत्यू; नागरिकांमधून संताप

रस्ता उपलब्ध करून देण्यासाठी किती जणांना बळी देण्याची वाट शासन बघत आहे; अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक देत आहेत.
Palghar News
Palghar NewsSaamtv
Published On: 

फयाज शेख, प्रतिनिधी...

Palghar News: पालघर जिल्ह्यातून एक दुर्देवी घटना समोर आली आहे. खराब रस्त्यामुळे वेळेत उपचार न मिळाल्याने दोन महिन्याच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याचा प्रकार विक्रमगड तालुक्यात घडला. या प्रकाराने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

Palghar News
Rohit Pawar Statement : खातेवाटप म्हणजे रुसवा फुगव्‍याचा खेळ; आमदार रोहित पवार यांचा टोला

याबाबत अधिक माहिती अशी की, पालघरच्या (Palghar) विक्रमगड व वाडा तालुक्याच्या हद्दीवर वसलेल्या म्हसेपाडा गावाची अवस्था अत्यंत दयनीय आहे. पावसाळ्याच्या चार महिने गावाला दोन नद्यांचा वेढा असतो. त्यामुळे या काळात धोकादायक अवस्थेत नदी पोहून किंवा टायरच्या टूबच्या सहाय्याने नदी पार करावी लागते.

आज (११, जुलै) ला याच पाड्यातील दोन महिन्याच्या बालिकेला रस्ता नसल्याने वेळवर उपचार मिळाले नाहीत. त्यामुळे या चिमुकलीचा दुर्देवी मृत्यू झाला. या घटनेने नागरिकांमध्ये संतापाची वाट उसळली आहे. राजकीय सत्तानाट्यात व्यस्त असलेले नेते आमच्या प्रश्नांकडे कधी लक्ष देणार? असा सवाल आता जनतेमधून उपस्थित होत आहे.

Palghar News
Congress Andolan : 'मोदी-अडानी भाई- भाई, देश बेचके खाए मलाई...' काॅंग्रेसने छेडले जेलभराे आंदाेलन

दरम्यान, येथील विद्यार्थिनी व गावांतील नागरिकांना प्रवास करावा कशा प्रकारे अडचणींचा सामना करत प्रवास करावा लागतो. ही बातमी गेल्या वर्षी साम टिव्हीने (Saamtv) 13 जुलैला प्रसारीत केली होती.

त्यानंतरही अद्याप कोणतीच कार्यवाही होत नसल्याने लोकांना पुल किंवा रस्ता उपलब्ध करून देण्यासाठी किती जणांना बळी देण्याची वाट शासन बघत आहे; अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक देत आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.