

तबरेज शेख, प्रतिनिधी...
Nashik Crime News: नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना नाशिकमधून समोर आली आहे. पतीचे नात्यातील एका महीलेशी अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून पत्नी व मुलाने पतीच्या डोक्यात मुसळीने वार करून खून केल्याचे उघडकीस आले आहे. इंदिरानगर परिसरातील दामोदर चौक यशवंत नगरमध्ये घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. (Crime News IN Marathi)
काय आहे संपूर्ण प्रकरण?
याबाबत अधिक माहिती अशी की, आज नाशिकमध्ये (Nashik) अशीच एक नात्याला हादरवून टाकणारी घटना घडली असून पत्नीने मुलांच्या मदतीने पतीची हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. दादाजी गवळी असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
दादाजी गवळी (४१) (रा. समृद्धी प्लाझा, यशवंत नगर दामोदर चौक पाथर्डी) यांचे नात्यातील एका महिलेशी अनैतिक संबंध होते. त्या कारणावरून पत्नी व त्यांच्यात नेहमी भांडण होत असतं. मध्यंतरी दोघांमध्ये वाद मिटवण्यात आले होते. हाच राग मनात ठेवून त्यांची पत्नी सुनीता गवळी (४०) व त्यांचा मुलगा निशांत गवळी (२०) यांनी गाढ झोपेत असलेले मयत दादाजी गवळी त्यांच्या डोक्यात मुसळीने जोरदार प्रहार करत त्यांचा निर्दयपणे खून केला. (Crime News)
आरोपी पोलिसांच्या ताब्यात...
घटनेची माहिती मिळताच पोलीस उपयुक्त चंद्रकांत खांडवी, स पो आ अंबादास भुसारे इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन पगारे, महिला पोलीस उपनिरीक्षक मनीषा शिंदे यांच्यासह गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व कर्मचारी त्वरित घटनास्थळी पोहोचले. तसेच घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला
दरम्यान, हत्या करणारे मुख्य आरोपी पत्नी आणि मुलाला इंदिरानगर (Indiranagar Police) पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिस याबाबतचा अधिक तपास करत असून मृत व्यक्तीचे अनैतिक संबंध असल्याच्या कारणाने ही हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.