मालेगाव महापालिका आयुक्तांसह तिघांना अटक; महाराष्ट्राच्या प्रशासनात खळबळ

Ravindra Jadhav Arrested In Rs 20 Lakh Bill Approval Case: मालेगाव महापालिका आयुक्त रवींद्र जाधव, स्वीय सहायक नीलेश पाटील आणि अकाउंटंट हरीश डिंबर यांना 20 लाखांच्या बिलासाठी लाच मागितल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
Nashik ACB arrests Malegaon Municipal Commissioner
Nashik ACB arrests Malegaon Municipal Commissionersaam tv
Published On: 

अभिजीत सोनवणे, साम टीव्ही

मालेगाव महापालिकेचे आयुक्त रवींद्र जाधव यांच्यासह तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) अटक केली आहे. कंत्राटदाराची दोन वेगवेगळ्या कामांची तब्बल 20 लाख रुपयांची बिले मंजूर केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या कारवाईमुळे मालेगाव महापालिका प्रशासनात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गवत काढण्याचे काम आणि जलवाहिनी कंत्राटदाराकडे लाचेची मागणी करण्यात आली होती. या तक्रारीच्या आधारे विभागाने कारवाई केली. या प्रकरणात महापालिका आयुक्त रवींद्र जाधव, त्यांचे स्वीय सहायक नीलेश पाटील आणि अकाउंटंट हरीश डिंबर या तिघांना अटक करण्यात आली आहे.

Nashik ACB arrests Malegaon Municipal Commissioner
Maharashtra Politics: ४ आमदारांचा एकच राजन मामा, राज्यभरात तुफान चर्चा; आहेत तरी कोण?

कंत्राटदारांची बिले मंजूर करण्यासाठी लाचेची मागणी केल्याचा आरोप त्यांच्यावर असून, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघांना अटक केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पुढील तपासाला सुरुवात केली आहे. आरोपींच्या घरांची झडती घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आयुक्तांसारख्या वरिष्ठ अधिकाऱ्याला लाचप्रकरणी अटक झाल्याने मालेगावच्या प्रशासकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

Nashik ACB arrests Malegaon Municipal Commissioner
मोठी बातमी! विधान परिषदेनंतर जिल्हा परिषदेचा धुरळा; सर्वोच्च न्यायालयाने दिले आदेश

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक भारत तांगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कंत्राटदाराच्या कामांची बिले अदा करण्यासाठी लाचेची मागणी केल्याची तक्रार प्राप्त झाली होती. या प्रकरणात महापालिका आयुक्तांसाह तिघांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. विशेष म्हणजे आयुक्त रवींद्र जाधव हे 31 ऑक्टोबरला सेवानिवृत्त होणार होते. सेवानिवृत्तीच्या दोन दिवस आधीच अटक केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com