मोठी बातमी! विधान परिषदेनंतर जिल्हा परिषदेचा धुरळा; सर्वोच्च न्यायालयाने दिले आदेश

Supreme Court, Maharashtra local body elections : महाराष्ट्रातील उर्वरित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या प्रलंबित निवडणुका न्यायालयाने यापूर्वी ठरवलेल्या अंतरिम व्यवस्थेनुसार घेता येणार आहेत.
Zilla Parishad Election:  जिल्हा परिषदेचा धुरळा कधी
Zilla Parishad Election saam tv
Published On: 

Maharashtra local body elections latest news : राज्यातील २० जिल्हा परिषदा आणि २२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने प्रलंबित असलेल्या या सर्व निवडणुका घेण्याचे आदेश आज दिले. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर आज यावर सुनावणी पार पडली. खंडपीठाने महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत.

महाराष्ट्रातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने आज महत्त्वाचा आदेश दिला. न्यायालयाने उर्वरित सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तात्काळ घेण्याचे निर्देश दिले आहेत. यापूर्वीच्या अंतरिम आदेशानुसार ज्या निवडणुका पार पडल्या आहेत, त्याच अटी आणि शर्तींवर उर्वरित निवडणुका देखील घेतल्या जाव्यात. निवडणुका रोखून ठेवण्याचे कोणतेही समर्थन असू शकत नाही, असे कोर्टाने स्पष्ट केले.

Zilla Parishad Election:  जिल्हा परिषदेचा धुरळा कधी
MLC Election Result: २८ जागांचा निकाल जाहीर! कुणाची बाजी अन् कुणाला धक्का? पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी

लोकशाही प्रक्रिया का थांबवली जावी? असा थेट सवाल सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी केला. राज्य सरकारने निवडणूक आयोगाला आवश्यक मनुष्यबळ पुरवावे, तसेच निवडणूक आयोगाने उर्वरित निवडणुकांची अधिसूचना काढून अनुपालन अहवाल (Compliance Report) न्यायालयात सादर करावा, असे आदेश दिले. ओबीसी आरक्षणाचा अंतिम निर्णय न्यायालयात प्रलंबित असला, तरी उर्वरित सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आधीच्या अंतरिम व्यवस्थेनुसार तात्काळ घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

Zilla Parishad Election:  जिल्हा परिषदेचा धुरळा कधी
MLC Election Result: विधान परिषदेच्या ५ जागांचा अंतिम निकाल जाहीर, मविआ ३ तर महायुतीला २ जागांवर यश; कुठे कोणत्या पक्षाच्या उमेदवाराचा विजय?

वरिष्ठ वकील इंदिरा जयसिंग यांनी न्यायालयात सांगितले की, न्यायालयाच्या आदेशानुसार १२ जिल्हा परिषदांच्या निवडणुका झाल्या आहेत, तर २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका बाकी आहेत. ५०% आरक्षणाची मर्यादा आणि ओबीसींचे आरक्षण यावरील अंतिम निर्णय न्यायालयाच्या पुढील निकालावर अवलंबून असेल, परंतु तोपर्यंत प्रक्रिया थांबवू नये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com