Leopard Attack
Leopard AttackSaam tv

Leopard Attack : घराबाहेर उभ्या चिमुकलीवर बिबट्याचा हल्ला; आईच्या डोळ्यादेखत बालिकेचा मृत्यू

Prakasha News : शेतात मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. दरम्यान ६ मे रोजी दिवसभर शेतात काम केल्यानंतर कानसिंग हे झोपडीत झोपले होते
Published on

प्रकाशा (नंदुरबार) : शेतात असलेल्या झोपडीबाहेर चिमुकली अंघोळीसाठी उभी होती. याचवेळी (Leopard) बिबट्याने या मुलावर हल्ला करत तिला उसाच्या शेतात फरपटत नेले. यात  साडेतीन वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. सदरची घटना प्रकाशा (Prakasha) शिवारातील शेतात ६ मे रोजी घडली. 

Leopard Attack
Buldhana News : रक्षा खडसेंच्या विरोधात प्रहार संघटना रस्त्यावर; कार्यकर्त्यांना डावलल्याचा आरोप, पत्रकच काढले

तळोदा (Taloda) तालुक्यातील तऱ्हावद पुनर्वसन येथील कानसिंग काशा पाडवी हे परिवारासह प्रकाशा शिवारातील शेतात झोपडी बांधून वास्तव्यास आहेत. शेतात मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. दरम्यान ६ मे रोजी दिवसभर (Nandurbar) शेतात काम केल्यानंतर कानसिंग हे झोपडीत झोपले होते. यावेळी त्यांच्या दोन्ही मुलींची अंघोळ करण्यासाठी आईने पाण्याची बादली भरून नेत मुलीला (Leopard Attack) झोपडीबाहेर उभी केली. तर दुसऱ्या मुलीलाही अंघोळीसाठी झोपडीतून बाहेर आणत होती. याच वेळी दिव्यांशी कानसिंग पाडवी (वय ३) हिच्यवर बिबट्याने हल्ला करत तिला फरपटत नेत असताना पाहिले. 

Leopard Attack
Water Shortage : सीना कोळेगाव प्रकल्पात केवळ ८ टक्के पाणीसाठा; परंडा तालुक्यात सिंचनाचा प्रश्न गंभीर

हे दृश्य पाहून आईने आरडाओरडा केला. यामुळे कानसिंगही झोपडी बाहेर आले. याची माहिती परिसरात पसल्याने पिसावर, तऱ्हावद येथील ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. जमावाने लाठ्याकाठ्या घेत बिबट्या व मुलीचा शोध घेतला. बिबट्या मुलीला जबड्यात धरून ऊस, बाजरीच्या शेतात फरपटत नेत होता. जवळपास अर्धा तास हा प्रकार सुरू होता. जमावाच्या आवाजाने बिबट्याने मुलीला सोडून देत पळ काढला. मात्र तोपर्यंत दिव्यांशीचा मृत्यू झाला होता. मुलीचा मृतदेह पाहून आई-वडिलांसह नातेवाइकांनी आक्रोश केला. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com