Water Shortage : सीना कोळेगाव प्रकल्पात केवळ ८ टक्के पाणीसाठा; परंडा तालुक्यात सिंचनाचा प्रश्न गंभीर

Dharashiv News : राज्यात यंदा कमी पाऊस झाल्याने धरणात मुबलक असे पाणी साठले नाही. शिवाय पाण्याची पातळी देखील खालावल्याने विहिरी व कूपनलिकांचे पाणी स्रोत आटले आहे
Seena Kolegaon Project
Seena Kolegaon ProjectSaam tv

बालाजी सुरवसे 

धाराशिव : यंदाच्या कमी पावसामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. धरणातील पाणी साठा देखील कमी होत असून आता (Dharashiv) धाराशिवच्या परंडा तालुक्यातील सर्वात मोठा असलेल्या सिना कोळेगाव प्रकल्पात देखील केवळ ८ टक्के पाणीसाठा शिल्लक राहीला आहे. यामुळे या भागात पाणीप्रश्न गंभीर होत चालला आहे. 

Seena Kolegaon Project
Water Shortage : संभाजीनगर शहरातच टँकरच्या फेऱ्या ४५० पार; महापालिकेच्या नो नेटवर्क भागात टँकरची मागणी वाढली

राज्यात यंदा कमी पाऊस (Rain) झाल्याने धरणात मुबलक असे पाणी साठले नाही. शिवाय पाण्याची पातळी देखील खालावल्याने विहिरी व कूपनलिकांचे (Water Scarcity) पाणी स्रोत आटले आहे. यामुळे राज्यातील अनेक भागात भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. धरणातील पाणी देखील आटू लागले आहे. यात (Paranda) परंडा तालुक्यातील सीना कोळेगाव प्रकल्पातील साठा देखील कमी झाला आहे. तर तालुक्यातील इतर मध्यम प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. कुपनलिका व विहीरी कोरड्या पडल्याने नागरीकांचा पाणी प्रश्न गंभीर बनला आहे. 

Seena Kolegaon Project
Buldhana News : रक्षा खडसेंच्या विरोधात प्रहार संघटना रस्त्यावर; कार्यकर्त्यांना डावलल्याचा आरोप, पत्रकच काढले

४ मध्यम प्रकल्प पडले कोरडे 

सिना कोळेगाव प्रकल्पात १४ दलघमी मृतसाठा पाणीसाठा आहे. हे पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्यात आले आहे. तर तालुक्यातील चांदणी, साकत, खासापुरी, निम्मखैरी मध्यम प्रकल्प कोरडे पडले आहेत. त्यामुळे तालुक्यात सिंचनाचा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे.  त्यामुळे आगामी काळातील पाण्याचा तुटवडा लक्षात घेता कमी पाण्यावरील पिक घेण्याकडे शेतकरी वळला आहे. कमी पावसामुळे खरीप हंगामापाठोपाठ आता रब्बी हंगाम देखील संकटात सापडला आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com