Buldhana News : रक्षा खडसेंच्या विरोधात प्रहार संघटना रस्त्यावर; कार्यकर्त्यांना डावलल्याचा आरोप, पत्रकच काढले

Buldhana News : प्रहारचे आमदार बच्चू कडू हे महायुतीत सहभागी आहेत. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी प्रहारचे कार्यकर्ते फिरत आहेत.
Buldhana News Raksha Khadse
Buldhana News Raksha KhadseSaam tv

बुलढाणा : लोकसभेच्या रावेर लोकसभा मतदार संघातील लोकसभेच्या उमेदवार रक्षा खडसे या प्रचारादरम्यान (Raver) रावेरमधील प्रहारच्या कार्यकर्त्यांना डावलले जात आहे. असा आरोप करत प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रक काढून रक्षा खडसे (Raksha Khadse) यांना मतदान न करता नोटा चे बटन दाबण्याचे आवाहन केले आहे. 

Buldhana News Raksha Khadse
Devendra Fadanvis : त्यांना पक्ष चालविणे कठीण असल्याने विलीनीकरणाचा निर्णय; देवेंद्र फडणवीस यांचा शरद पवारांना टोला

प्रहारचे आमदार बच्चू कडू हे महायुतीत सहभागी आहेत. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी प्रहारचे (Buldhana) कार्यकर्ते फिरत आहेत. असे असतानाही लोकसभेच्या रावेर मतदार संघातील महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे या आपल्या प्रचारात केवळ (Bachchu Kadu) बच्चू कडू यांचा फोटो वापरतात. मात्र रावेर मतदार संघातील प्रहारच्या कार्यकर्त्यांना डावलत असल्याचा आरोप प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. तसेच आज मलकापूर (Malkapur) येथे पत्रक काढून रक्षा खडसे यांना मतदान न करण्याच आवाहन केल आहे. 

Buldhana News Raksha Khadse
Water Shortage : संभाजीनगर शहरातच टँकरच्या फेऱ्या ४५० पार; महापालिकेच्या नो नेटवर्क भागात टँकरची मागणी वाढली

'नोटा'चे बटन दाबण्याचे आवाहन 

प्रहारकडून काढण्यात आलेल्या पत्रकात रक्षा खडसे यांना मतदान न करता सर्वात शेवटचं नोटांचे बटन दाबण्याचंही आवाहन प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे. यामुळे आता रावेर मतदार संघात महायुतीच्या उमेदवाराविरुद्ध प्रहार संघटना रस्त्यावर उतरल्या चित्र आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com