

- सागर निकवडे
Nandurbar News : धडगाव तालुक्यातील काकडदा नजिक असलेल्या वलवाल या गावातील दीडशे फूट खोल दरीत पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याची घटना समाेर आहे. पाेलीसांनी दिेलेल्या माहितीनूसार अमरसिंग डेका पावरा (वय 27) असे मृत व्यक्तीची नाव आहे. (Maharashtra News)
अमरसिंग पावरा याचा एवढ्या खोल दरीत मृतदेह आढळल्याने वलवाल ग्रामस्थ उलटसुलट चर्चा करु लागले आहेत. या युवकाचा मृतदेह येथे कसा अशी देखील चर्चा हाेऊ लागली आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच धडगांव पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले.
पोलीस प्रशासन व वलवाल ग्रामस्थांच्या मदतीने दरीत उतरून मृतदेह काढण्यात आला. हा मृतदेह शवविच्छेदनासाठी धडगाव ग्रामीण रुग्णालय येथे नेण्यात आला आहे. दरम्यान अमरसिंग पावरा यांचा घातपात की आत्महत्या ह्याचा शोध घेण्याचे काम स्थानिक पोलीसांकडून सुरू करण्यात आले आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.