सागर निकवाडे
नंदुरबार : नंदुरबार शहरात लावण्यात आलेले अनधिकृत होर्डिंग्ज काढण्याच्या कारवाईला पालिकेने आता सुरवात केली आहे. मुंबई घाटकोपरच्या दुर्घटनेनंतर नंदुरबार पालिकेला उशिरा का होईना पण जग आली आहे. यामुळे किमान वादळी वाऱ्यात होणारी दुर्घटना टाळता येणार आहे.
मुंबई घाटकोपर येथे झालेल्या होल्डिंग दुर्घटनेत १६ जणांचा मृत्यू झाला होता. हि घटना घडल्यानंतर राज्यभरातील शहरांमधील होर्डिग्जचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यानुसार नंदुरबार (Nandurbar) नगरपालिका देखील सतर्क झाली असून अनधिकृत असलेल्या होल्डिंगवर कारवाई करण्यास आता सुरवात केली आहे. या होल्डिंग काढण्यात आल्या आहेत.
शहरातील उंच असलेल्या होल्डिंग काढून घेण्यात येत आहे. कुठलीही दुर्घटना घडू नये; यासाठी नंदुरबार पालिका दक्षता घेत आहे. मुंबईच्या घाटकोपर येथील होल्डिंग दुर्घटना नंतर संपूर्ण राज्यातील होल्डिंगच्या प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यामुळे नंदुरबार नगरपालिका देखील आता सतर्क झाले असून पालिकेच्या हद्दीत असलेल्या अनधिकृत होल्डिंग काढून घेत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.