Khamgaon News : कापूस बियाणांसोबत दुसरे बियाणे खरेदीची सक्ती; खामगावच्या जैन कृषी केंद्राचा परवाना रद्द, कृषी विभागाची कारवाई

Buldhana News : सध्या बियाणे खरेदीची लगबग सुरु आहे. या अनुषंगाने कृषी विभागाची बियाणे, खात विक्री करणाऱ्यांवर करडी नजर आहे
Khamgaon News
Khamgaon NewsSaam tv

बुलढाणा : सध्या बियाणे खरेदीची लगबग सुरु आहे. या अनुषंगाने कृषी विभागाची बियाणे, खात विक्री करणाऱ्यांवर करडी नजर आहे. याच दरम्यान शेतकऱ्यांकडून कापूस बियाणे खरेदी करताना त्यासोबत अन्य बियाणे खरेदीची सक्ती केली जात असल्याचा प्रकार खामगाव येथे समोर आला. याबाबत कृषी विभागाने कारवाई करत जैन कृषी केंद्राचा परवाना रद्द केला आहे. 

Khamgaon News
Marathwada Water Crisis : मराठवाड्यात टँकरची संख्या पोहोचली 2 हजाराच्या वर; पावसाळा सुरू झाला तरी भीषण पाणी टंचाई

बुलढाण्याच्या (Buldhana) खामगाव येथील जैन कृषी केंद्र येथे हा प्रकार सुरु होता. या कृषी केंद्राच्या संचालकांनी परिसरातील शेतकऱ्यांना रुची या कपाशी बियाणे सोबत इतर बियाणे घ्यावे लागेल, अन्यथा रुची बियाणे मिळणार नाही अशी अट घातली होती. शिवाय दुकानात रुची या वाणाचा साठा उपलब्ध असताना ही शेतकरी (Farmer) ग्राहकांना नकार दिला जात होता. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी संतापले होते. याबाबत तक्रारीदेखील करण्यात आल्या होत्या. 

Khamgaon News
Kalyan Crime News : फुटपाथवरून सहा महिन्याच्या चिमुरड्याचे अपहरण; बारा तासात पोलिसांकडून गुन्ह्याची उकल

दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या अमोल टीकार यांनी कृषी केंद्र संचालकांचे स्टिंग ऑपरेशन सुद्धा केले होते. कृषी विभागाने याची चौकशी केली असता कृषी केंद्र संचालक दोषी आढळला असून कृषी विभागाने कारवाई करत जैन कृषी केंद्राचा परवाना निलंबित केला. त्यामुळे खामगावात खळबळ उडाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com