सागर निकवाडे
नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव आणि तळोदा या दोन मुख्य तालुक्यांना जोडणाऱ्या चांदशैली घाटात आज पुन्हा दरड कोसळली आहे. जिल्ह्यात सकाळपासून पाऊस पडत असल्याने घाट रस्त्यातील डोंगरावरून दगड कोसळत आहेत. यात भाला मोठा दगड रस्त्यावर येऊन पडल्याने दोन्ही बाजूनी जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे.
नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील बहुतांश भागात पहाटेपासूनच पाऊस सुरु आहे. दरम्यान मान्सूनच्या पहिल्या जोरदार झालेल्या पावसात देखील म्हणजे जून महिन्यात चांदशैली घाटात दरड कोसळली होती. यावेळी देखील वाहतूक ठप्प झाली होती. बऱ्याच वेळानंतर रस्त्यावर पडलेले दगड जेसीबीच्या साहाय्याने दूर करून वाहतूक सुरळीत करण्यात आली होती. यानंतर यंदाच्या पावसाळ्यात हि दुसऱ्यांदा दरड कोसळली आहे. सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे (Chandsaili Ghat) या भागात एका वळण रस्त्यावर भला मोठा दगड हा रस्त्यात कोसळल्याने वाहतूक ठप्प झाले आहे.
मोठी दुर्घटना टळली
चांदशैली घाटात वाहतूक सुरू असतानाच मला मोठा दगड रस्त्यावर कोसळला. मात्र सुदैवाने यात कुठलीही अनुचित घटना घडलेली नाही. मात्र वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय पाहायला मिळाली. बांधकाम विभागाच्या दुर्लक्ष होत असल्यामुळे येथे काही उपाययोजना अद्यापपर्यंत झालेली नाही. यामुळे डोंगरावरील दगड थेट रस्त्यावर येऊन पडत असतात. यात नागरिकांचा जीव जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. आज भाला मोठा दगड कोसळला असून मोठी दुर्घटना टळली आहे. रस्त्यावर पडलेला दगड हातोड्याचा माध्यमातून फोडण्यात येत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.