Ladki Bahin Yojana : नंदुरबार जिल्ह्यातील सेतू केंद्रांवर सर्व्हर डाऊन; उत्पन्नाचा दाखला काढणाऱ्यांच्या रांगा

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भाग असलेला धडगाव तालुक्यात सेतू केंद्रांवर विविध दाखले करण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin YojanaSaam tv
Published On

सागर निकवाडे 
नंदुरबार
: राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेची घोषणा केल्यानंतर अर्ज भरणाऱ्याची गर्दी होत आहे. दरम्यान यासाठी आवश्यक असलेल्या उत्पन्नाच्या दाखल्यासाठी सेतू केंद्रावर प्रचंड गर्दी होत असताना सर्व्हर डाऊन झाल्याची समस्या निर्माण झाली आहे. महा-ई-सेवा केंद्राची वेबसाईट संथ गतीने सुरू असल्याने अडचणी वाढल्या आहेत. यामुळे काम अगदी संथगतीने होत असल्याने दाखला काढणाऱ्यांच्या सेतू केंद्राबाहेर लांबच लाँग रंग लागल्या आहेत. 

Ladki Bahin Yojana
Bhandara News : फाटक्या नोटा असल्याचे सांगत महिलेस २१ हजारात गंडवले; विदर्भ कोकण बँकेतील प्रकार

नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील दुर्गम भाग असलेला धडगाव तालुक्यात सेतू केंद्रांवर विविध दाखले करण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती. त्यातच आता सेतू केंद्रांवर सर्व्हर डाऊन झालेला याचा परिणाम आता सेतू केंद्राचा कामकाजावर पाहताना मिळत आहेत.  सर्व्हर डाऊन असल्यामुळे नागरिकांचे रांग देखील वाढलेले आहे. महा-ई- सेवा केंद्राची वेबसाईट संथ गतीने सुरू असल्याने उत्पन्नाचा दाखला काढत असताना (Setu Center) सेतू केंद्राचा कर्मचाऱ्यांना अडचणी निर्माण झाल्या आहेत.

Ladki Bahin Yojana
Shegaon News : शेगावमध्ये गणेशोत्सवासह इतर मिरवणुकीमध्ये डीजे बंदी; न वाजवण्याची शपथ, मंडळांना मिळणार ५१ हजाराचे बक्षीस

सेतू केंद्राबाहेर गोंधळ

नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग समजल्या जाणाऱ्या धडगाव शहरात शेतीतून केंद्रांवर सकाळपासूनच गर्दी पाहायला मिळत आहे. धडगाव तालुका भौगोलिक दृष्ट्या मोठ्या असल्याने दहा ते पंधरा किलोमीटर प्रवास करून आदिवासी महिला या सेतू केंद्रांवर येत आहेत. कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी ते या ठिकाणी रांग लावत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. दारिद्र्य रेषेखालील महिलांना डोमासाईलमध्ये सूट देण्यात आली आहे. मात्र उत्पन्नाचा दाखला हा महत्त्वाचा असल्याने महिला आणि पुरुष गर्दी करत आहेत. मात्र फॉर्म भरावा कसा या संदर्भातली कुठलीही माहिती उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांची चांगलाच गोंधळ उडालेला पाहायला मिळत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com