

तळोदा (नंदुरबार) : रांझणी (ता. तळोदा) येथील शेठ राणूलाल फुलचंद जैन कृषि तंत्र विद्यालयात असलेल्या गायीच्या वासरूवर बिबट्याने हल्ला करत जखमी केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे रांझणी शेतशिवारात बिबट्याची (leopard) दहशत कायम असून शेतशिवारातील राखणदार, शेतकरी, शेतमजूर तसेच ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने (Forest Department) बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. (nandurbar news Cow calf injured in leopard attack)
रांझणी (ता. तळोदा) Taloda येथील जैन कृषि विद्यालयात असलेल्या गायीच्या गोठ्याला शनिवारी रात्री बिबट्याने आपले लक्ष केले होते. बिबट्याने गोठ्यात आत शिरून त्याठिकाणी बांधलेल्या गायीच्या वासरूवर हल्ला केला. दरम्यान शाळेतील रखवालदार भरत ठाकरे यांना गोठ्यातून काहीतरी आवाज येत असल्याने ते गायीच्या गोठ्याकडे धावत गेले. त्यांना गोठ्यात बांधलेल्या गायीच्या वासरूवर बिबट्याने हल्ला केल्याचे दिसले.
अन् बिबट्या झाला पसार
रखवालदारांने जोरजोरात आरडाओरड करण्यास सुरुवात केली. आवाजामुळे बिबट्या गायीचे वासरू सोडून तेथून निघून गेला. मात्र बिबट्याच्या हल्ल्यात गायीच्या वासरू जखमी झाले असून हल्ल्यात वासरूचा तोंडावर जखमा झाल्या आहेत. दरम्यान रांझणी शेतशिवारात बिबट्याचा मुक्त संचाराने रखवालदार, शेतकरी, शेतमजूर तसेच ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. याआधी देखील या परिसरात तसेच चिनोदा परिसरात मोठ्या प्रमाणावर बिबट्याने नागरिकांना दर्शन दिले आहे. त्यामुळे वनविभागाने तातडीने कार्यवाही करीत बिबट्याचा बंदोबस्त करावा; अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.