रायगड : केंद्रीय राज्य रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे विरोधात नाभिक समाज आक्रमक झाले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयावर समाजाने मोर्चा काढत आंदोलन केले. यावेळी दानवेच्या फोटोला जोडे मारून त्याच्या पेंढ्याच्या पुतळ्याला आग मोर्चेकरांनी लावून दहन करून निषेध व्यक्त केला. (raigad news Movement against Raosaheb Danve collector office)
महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार हे तिरुपती बालाजी येथील न्हाव्यासारखे असल्याचे व्यक्तव्य केंद्रीय राज्य रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी जालना येथे केले होते. याबाबत नाभिक समाजात तीव्र संतापाची भावना पसरली आहे. रायगड जिल्हा नाभिक समाजातर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयावर शेकडोच्या संख्येने दानवेच्या विरोधात मोर्चा काढला. सहा दिवसात दानवे यांनी समाजची माफी मागावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल; असा इशारा समाजातर्फे देण्यात आला आहे.
तिव्र घोषणाबाजी
अलिबाग (Alibag) शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्च्याला सुरुवात झाली. एसटी स्थानक, अरुणकुमार वैद्य शाळा, न्यायालय मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयवर मोर्चा पोहचला. यावेळी हिराकोट तलावाजवळ मोर्च्याला अडविण्यात आला. त्यानंतर मोर्च्याचे सभेत रूपांतर झाले. एवढी माणसे कशाला दानवेच्या मैताला, निम का पत्ता कडवा है दानवे.. है, दुरी तिरी इक्का दानवे आहे...,दानवेच्या बैलाला .... अशा घोषणांनी परिसर दुमदुमला होता. शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांना आपल्या मागण्याचे निवेदन दिले.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.