सागर निकवाडे
नंदुरबार : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रा अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात वक्तव्य करण्यात आले होते. याचा निषेध करत (Nandurbar) नंदुरबारमध्ये भाजपच्या वतीने (Rahul Gandhi) निदर्शने करत यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. (Live Marathi News)
भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी मोदी ओबीसी समाजात जन्माला आले असले तरी ते बोगस ओबीसी असल्याचे वक्तव्य केल्याचा दावा भाजपाच्या वतीने करण्यात आला आहे. यामुळे नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) संदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे देशातील संपूर्ण ओबीसी समाजाचा अपमान झाल्याचा दावाही भाजपाने केला आहे. या वक्तव्याचा निषेध भाजपकडून केला जात आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
नंदुरबार भाजपबत्तीने राहुल गांधींच्या वक्तव्याच्या निषेधार्थ नंदुरबार जिल्हा भाजपाच्या वतीने निषेध करण्यात आला. तसेच नंदुरबार शहरातील नगरपालिका चौकात निषेध आंदोलन करण्यात आले. तसेच राहुल गांधींनी मोदी आणि ओबीसी समाजाची माफी मागण्याची मागणी यावेळी करण्यात आली. या आंदोलनात भाजपा कार्यकर्ते आणि जिल्हा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.