Rahul Gandhi on Pm Modi : PM मोदी ओबीसी नाहीत, ते देशातील जनतेशी खोटं बोलतायेत; राहुल गांधींचा निशाणा, VIDEO

Rahul Gandhi on Pm Modi over Caste : पंतप्रधान नरेंद्र मोदी ओबीसी जातीत जन्माला आल्याचे लोकांशी खोटं बोलत आहेत, असं म्हणत राहुल गांधी यांनी निशाणा साधला आहे.
rahul gandhi and narendra modi
rahul gandhi and narendra modi saam tv

Rahul Gandhi News :

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर त्यांच्या जातीवरून निशाणा साधलाआहे. पंतप्रधान मोदी हे इतर मागासवर्गीय म्हणजेच ओबीसी समाजातील नाहीत. नरेंद्र मोदींचा जन्म सामान्य प्रवर्गात झाला आहे. मोदी ओबीसी जातीत जन्माला आल्याचे लोकांशी खोटं बोलत आहेत, असं म्हणत राहुल गांधी यांनी निशाणा साधला आहे.

राहुल गांधी यांनी ओडिशातून जनतेला संबोधित करताना म्हटलं की, भाजपचा कोणताही कार्यकर्ता जेव्हा तुमच्याकडे येईल, तेव्हा त्याला एक गोष्ट सांगा की पंतप्रधान संपूर्ण देशाशी खोटं बोलले आहेत. पंतप्रधान ओबीसी आहेत, असं खोटे बोलत आहेत.  (Latest Marathi News)

rahul gandhi and narendra modi
PM Modi Speech : लोकशाही मूल्यांची चर्चा होईल, तेव्हा मनमोहन सिंग यांची आठवण येईल : नरेंद्र मोदी

राहुल गांधी पुढे म्हणाले, नरेंद्र मोदी यांचा जन्म तेली समाजात झाला आहे. २००० साली भाजपने या समाजाला ओबीसीचा दर्जा दिला होता. मला माहित आहे की नरेंद्र मोदी ओबीसी नाहीत. कारण ते कोणत्याही ओबीसीला स्वीकारत नाहीत. ओबीसी नसल्यामुळे ते जात जनगणना करणार नाहीत.

मोदी महागडे सूट घालतात आणि स्वतःला गरीब आणि फकीर म्हणवतात. सकाळी नवा ड्रेस, संध्याकाळी नवा ड्रेस आणि रोज नवा पोशाख घालून ते स्वत:ला ओबीसी म्हणवून घेतात. मोदीजी कधीही कोणत्याही ओबीसीला मिठी मारत नाहीत. तो कोणत्याही शेतकऱ्याचा हात धरत नाही.भ

भाजपचा पलटवार

केंद्रीय मंत्री कौशल किशोर यांनी राहुल गांधीवर पलटवार केला आहे. राहुल गांधींनी आधी जातींचा अभ्यास करावा. जात जनगणनेबद्दल ते बोलत राहतात. 'तेली' समाज कोणत्या वर्गाचा आहे हे त्यांना माहीत नाही. त्यांचा ओबीसी प्रवर्गात समावेश करण्यात आला आहे. पंतप्रधान मोदीही याच समाजातून आलेले आहेत. याबाबत राहुल गांधी यांना काहीच माहिती नाही. त्यांना देशातील समाजाविषयी माहिती नाही. तो विचार न करता बोलत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com