Nandurbar Chilli Market : नंदुरबार बाजार समितीत मिरचीची विक्रमी आवक, किती रुपये मिळताेय दर?

Nandurbar Mirchi Market : मार्च अखेर पर्यत मिरचीचा हंगाम सुरु राहील असा अंदाज नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीतून व्यक्त करण्यात आला आहे.
nandurbar mirchi market
nandurbar mirchi marketsaam tv
Published On

Nandurbar News :

- सागर निकवाडे

देशातील दुसऱ्या क्रमांकाची मिरचीची बाजार पेठ म्हणून नंदुरबार बाजार समितीची (nandurbar apmc market) ओळख आहे. फेब्रूवारी पहिल्या आठवड्याचा पर्यंत गेल्या दहा वर्षातील सर्वाधिक आवक झाली आहे. मागील वर्षी संपूर्ण हंगामात २ लाख २५ हजार क्विंटल मिरची आवक झाली होती. या वर्षी फेब्रूवारी महिन्याचा पहिल्या आठवड्यात बाजार समिती मध्ये २ लाख ६० हजार क्विंटल आवकचा टप्पा पार केला. हंगाम संपेपर्यंत बाजार समितीत ३ लाख क्विंटल खरेदीचा टप्पा पार करेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. (Maharashtra News)

यावर्षी नंदुरबार जिल्हा आणि शेजारील गुजरात आणि मध्य प्रदेश राज्यात मोठ्या प्रमाणात मिरचीचे उत्पादन झाले आहे. नंदुरबार बाजार समिती मध्ये गेल्या दहा वर्षातील सर्वाधिक आवक झाली आहे. सध्या तरी २ लाख ६० हजार मिरचीची आवक झाली आहे.

nandurbar mirchi market
Ambadas Danve Video : जनता दरबारातून अंबादास दानवेंचा पोलिस अधीक्षकांना फाेन, सुनावले खडेबोल (पाहा व्हिडिओ)

सध्या ओल्या लाल मिरचीला २५०० ते ९००० हजार पर्यंत दर मिळत आहे. कोरड्या लाल मिरचीला ७५०० ते १८००० हजार पर्यंतचा दर मिळत आहे. दररोज १०० ते १५० वाहनातून २००० क्विंटल मिरचीची आवक होत आहे. मार्च आखेर पर्यत हंगाम सुरु राहील असा अंदाज कृषी उत्पन्न बाजार समितीतून व्यक्त करण्यात आला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

nandurbar mirchi market
Satara : सातारा जिल्ह्यात 8 फेब्रुवारीपासून राजधानी महा संस्कृती महोत्सवाची मेजवानी, जाणून घ्या कार्यक्रम

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com