Maharashtra Politics: 'निकाल भाजपच्याच बाजूने, पाचही राज्यात कमळ फुलणार..' खासदार हिना गावित यांचा दावा

5 State Election Results: एक्झिट पोलमध्ये भाजपला पाचही राज्यामध्ये धक्का बसणार असल्याचे संकेत दिलेत. मात्र या सर्व संस्थांच्या सर्वेंना खोटं ठरवत भाजप सर्व राज्यात निवडून येणार असल्याच्या विश्वास खासदार डॉ. हिना गावित यांनी व्यक्त केला आहे.
Hina Gavit News
Hina Gavit News Saamtv
Published On

सागर निकवाडे, नंदुरबार|ता. २ डिसेंबर २०२३

Nandurbar News:

मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थानस तेलंगणा आणि मिझोराममध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्यात. उद्या (रविवार, ३ डिसेंबर) यामधील चार राज्यांची मतमोजणी होणार आहेत तर मिझोरामचे निकाल सोमवारी हाती येतील. त्याआधी आलेल्या एक्झिट पोलमध्ये भाजपला सर्वच राज्यामध्ये धक्का बसणार असल्याचे संकेत दिलेत. मात्र या सर्व संस्थांच्या सर्वेंना खोटं ठरवत भाजप सर्व राज्यात निवडून येणार असल्याच्या विश्वास खासदार डॉ. हिना गावित यांनी व्यक्त केला आहे.

मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि तेलंगणा विधानसभा निवडणूकांची मतमोजणी होणार आहे. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांची सेमीफायनल म्हणून या निवडणूकांकडे पाहिले जात असून यामध्ये कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, या निवडणूकीत भाजपचाच विजय होणार असल्याचा विश्वास प्रवक्त्या खासदार हिना गावीत यांनी व्यक्त केला आहे.

"देशातील पाच राज्यांच्या निवडणुकीसाठी मतदान झाला असून या राज्यांसाठी मतमोजणी उद्या होणार आहे यासाठी अनेक संस्थांनी सर्वे केला असून हा सर्वे भाजपाच्या विरोधात असल्याच्या दाखवलं आहेत मात्र मतदार हा भाजपाच्या बाजूने असून मतदार आपला हक्क बजावला आहे," असे त्या म्हणाल्या.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Hina Gavit News
Rajesh Tope Car Attacked : माजी मंत्री राजेश टोपेंच्या कारवर हल्ला; दगडफेक झाली, काळं फासण्याचा प्रयत्न

तसेच "देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांसोबतच गोरगरीब नागरिकांसाठी अनेक विकासाच्या प्रभावी असे योजना राबवल्या आहेत. त्यामुळे मतदार हा भाजपाच्या पाठीशी उभा राहणार असून पाची राज्यांमध्ये भाजपाच्या कमल फुलणार असल्याचा विश्वासही राष्ट्रीय प्रवक्त्या खासदार डॉ. हिना गावित यांनी व्यक्त केला आहे. (Latest Marathi News)

Hina Gavit News
Amol Kolhe News: प्रत्येक चौकात २५ हजारांची वसुली अन् २० गाड्यांवर कारवाई... अमोल कोल्हेंचे खळबळजनक आरोप; काय घडलं?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com