Amol Kolhe News
Amol Kolhe NewsSaamtv

Amol Kolhe News: प्रत्येक चौकात २५ हजारांची वसुली अन् २० गाड्यांवर कारवाई... अमोल कोल्हेंचे खळबळजनक आरोप; काय घडलं?

Amol Kolhe News: मुंबईमधील वाहतूक पोलिसांना वसूलीचे टार्गेट देण्यात आले आहे, प्रत्येक चौकात २५ हजारांची वसूली आणि २० वाहनांवर कारवाई करण्याचे आदेश दिल्याचा खळबळजनक दावा खासदार अमोल कोल्हे यांनी केला आहे.
Published on

Amol Kolhe News:

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि शिरुरचे खासदार अमोल कोल्हे यांनी मुंबईतील वाहतुक पोलिसांच्या वसुलीचा एक धक्कादायक अनुभव शेअर केला करत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. मुंबईमधील वाहतूक पोलिसांना वसूलीचे टार्गेट देण्यात आले आहे, प्रत्येक चौकात २५ हजारांची वसूली आणि २० वाहनांवर कारवाई करण्याचे आदेश दिल्याचा खळबळजनक दावा अमोल कोल्हे यांनी केला आहे.

काय म्हणालेत अमोल कोल्हे?

"मुंबईत सिग्नल्स वाहतूक शाखेच्या महिला पोलिसांनी गाडी अडवून ड्रायव्हरला ऑनलाईन दंड भरण्यास सांगितले. मी स्वतः काय प्रकार आहे याची माहिती घेताना त्या भगिनीने थेट मोबाईलवरील मेसेज दाखवला. प्रत्येक चौकात २५००० रूपयांची वसुली व २० वाहनांवर कारवाई झाली पाहिजे."

मुंबईत (Mumbai 652 ट्रॅफिक जंक्शन आहेत. 25,000×652 =1,63,00,000/ प्रति दिन म्हणजे फक्त एकट्या मुंबईत तब्बल 1.63 कोटी रुपये.. इतर शहरांचं काय? असा सवालही अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी उपस्थित केला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Amol Kolhe News
Sanjay Raut News: '२०२४ पर्यंत थांबा, आपोआप तुरुंगात जाणार..' मंत्री दादा भुसेंच्या बालेकिल्ल्यात संजय राऊत कडाडले

तसेच संबंधित मंत्रीमहोदयांनी वा अधिकाऱ्यांनी खुलासा केल्यास वाहतूक शाखेचा उपयोग वाहतूक नियमनापेक्षा वसुलीसाठी होतोय का? याची जनतेला माहिती मिळेल! असे म्हणत ट्रिपल इंजिन.. ट्रिपल वसुली??? असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

अशा प्रकारे जर टार्गेट देऊन वसुली केली जात असेल तर खेदाने ट्रीपल इंजिन सरकारची ट्रीपल वसुली चालू आहे, म्हणावे लागेल.. असे अमोल कोल्हे म्हणालेत. या धक्कादायक अनुभव असल्याचेही अमोल कोल्हे म्हणालेत. कोल्हेंच्या या गंभीर आरोपांनी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com