Branded Fake Watches Seized In Mumbai : मुंबईत ६ कोटींची १५३७ घड्याळे जप्त, ९ दुकानांवर पोलिसांचे छापे, ब्रँडच्या नावाखाली 'बनावटगिरी'

Fake Branded Watch Seized: मुंबई पोलिसांनी मुसाफिरखाना, फातिमा मंझील बिल्डिंग येथील एटी मार्केटमधील दुकानांवर धाड टाकून प्रसिद्ध ब्रँडची तब्बल ६ कोटी रुपयांची १५३७ बनावट घड्याळे जप्त केली आहेत.
Branded Watches Seized
Branded Watches SeizedSaam Digital
Published On

Fake Branded Watch Seized

मुंबई पोलिसांनी मुसाफिरखाना, फातिमा मंझील बिल्डिंग येथील एटी मार्केटमधील दुकानांवर धाड टाकून प्रसिद्ध ब्रँडची तब्बल ६ कोटी रुपयांची १५३७ बनावट घड्याळे जप्त केली आहेत. मुंबई गु्न्हे शाखा युनिट २ ने ही कारवाई केली असून याप्रकरणी चार जणांना ताब्यात घेतले आहे. राडो, टिसॉट, ओमेगा, ऑडेमार्स पिगेट, ह्यू बॉस या प्रसिद्ध ब्रँडची ही घड्याळे आहेत. संबंधीत कंपन्यांनी तक्रार दाखल केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

पोलिसांनी याप्रकरणी घेवाराम अण्णाराम चौधरी (वय ३२), भावेशकुमार औखाजी प्रजापती (वय ३३), गणेश नारायण भारती (वय ४८) आणि मोहम्मद शोएब अब्दुल गनी कुरेशी (वय 33) या संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत प्रसिद्ध कंपन्यांची ब्रँडेड घड्याळे अनधिकृतरित्या बनबून ती बाजारात विक्री केली जात होती. याबाबत संबंधिक कंपन्यांच्या प्रतिनिधींनी पोलिसांकडे तक्रार जाखल केली होती. त्यावरून मुंबई गु्न्हे शाखा युनिट २ ने मुसाफिरखाना, फातिमा मंझील बिल्डिंग येथील ९ दुकानांपर छापे टाकले. या दुकानांमध्ये अनेक प्रसिद्ध ब्रँडची बनावट घड्याळे आढळून आली. यात राडो, टिसॉट, ओमेगा, ऑडेमार्स पिगेट, ह्यू बॉस या प्रसिद्ध ब्रँडच्या1537 घड्याळांचा समावेश आहे. ज्याची किंमत ६ कोटी रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Branded Watches Seized
Ulhasnagar News: बापरे! पोटात दुखतं म्हणून रुग्णालयात गेली; शस्त्रक्रियेत महिलेच्या पोटातून निघाला अर्धा किलो मांसाचा गोळा

पोलिसांनी या प्रकरणी चार जणांना ताब्यात घेतले असून आरोपींविरुद्ध आयपीसीच्या कलम 420,482,486,487 आणि कॉपीराइट कायद्याच्या संबंधित तरतुदींनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच बनावट घड्याळे बनवण्यात अजून कोणी सामिल आहे का याचा शोध सुरू असून आरोपींची कसून चौकशी पोलिसांकडून करण्यात येत आहे.

Branded Watches Seized
Pune MNS News: मनसेच्या 'खळखट्याक'ला पुणे पोलिसांचा दणका; दुकानांच्या तोडफोड प्रकरणी २० ते २२ जणांवर गुन्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com