खोजल्या वण्या तडवी (रा. बिजरीगव्हाण, ता. अक्कलकुवा) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव असून, सुग्या सन्या तडवी असे फरार संशयिताचे नाव आहे. पोलीस सूत्रांनुसार, जिल्ह्यातील दुचाकी चोरीचे प्रमाण पाहता चोरट्यांना जेरबंद करण्याच्या सूचना प्रभारी पोलीस अधीक्षक विजय पवार यांनी दिल्या होत्या. त्यानुसार, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी तपास सुरू केला आहे.
नंदुरबारमधील भोणे फाटा परिसरात एकजण कमी किंमतीत दुचाकी विकत असल्याची माहिती अधीक्षक पवार यांना मिळाली त्यांनी तातडीने एलसीबीचे निरीक्षक कळमकर यांना ही माहिती दिली. त्यांनी दोन पथके तयार करून संशयिताच्या मुसक्या आवळण्यास पथकाला सांगितले. पथकाने भोणे फाटा परिसरात सापळा लावला असता, तेथे टपरीवर दोघेजण विनानंबरच्या दुचाकीसह दिसले. त्यांना पोलीस आल्याची चाहुल लागताच ते दुचाकी सोडून पळू लागले. त्यातील एकाला पाठलाग करून ताब्यात घेतले असता, त्याने त्याचे नाव खोजल्या वण्या तडवी असल्याचे सांगितले.
त्याच्याकडून गुजरातमधून चोरून आणलेली दुचाकी जप्त करण्यात आली. त्याची अधिक चौकशी केली असता, त्याने चुलतभाऊ सुग्या सन्या तडवी याच्या मदतीने दुचाकी चोरी करत असल्याचे सांगितले. त्याच्याकडून एलसीबीने ३ लाख ३५ हजार रुपयांच्या एकूण ८ दुचाकी जप्त केल्या. दरम्यान, अटक करण्यात आलेला खोजल्या तडवी याच्यावर मालमत्ताविरुद्धचे तब्बल २३ गुन्हे नंदुरबार, धुळे, जळगाव व गुजरातमध्ये दाखल आहेत.
Edited By : Krushnarav Sathe
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.