Honey Trap : शारीरिक संबंधाचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत २३ लाख लुबाडले!

Naguar Honey Trap : पतीच्या गरिबीला कंटाळून, स्वतःची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी विवाहित महिलेने सौंदर्याचा केला घृणास्पद उपयोग!
Honey Trap Case News in Marathi, Nagpur crime news updates
Honey Trap Case News in Marathi, Nagpur crime news updatesSAAM TV
Published On

Rajasthan Nagaur Honey Trap: राजस्थानच्या नागौर जिल्ह्यात हनी ट्रॅपची (Honey Trap) धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एक महिला एका मार्बल व्यापाऱ्याला सोशल मीडियावर (Social Media) आक्षेपार्ह व्हिडिओ (Video) टाकण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करत होती. आतापर्यंत तिने व्यापाऱ्याकडून २३ लाख रुपये वसूल केले होते. हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचल्यानंतर महिलेसह ३ जणांना अटक करण्यात आली. (Honey Trap Case News in Marathi)

कुटुंबीयांनी व्यावसायिकाच्या हरवल्याची तक्रार केली होती दाखल

नागौर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 22 एप्रिल रोजी धानी, बुलडको, मकराना येथे राहणारा मार्बल व्यापारी न सांगता घरातून निघून गेला. 23 एप्रिल रोजी कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली. व्यावसायिकाची भेट घेतल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला असता एक धक्कादायक प्रकार समोर आला. वास्तविक, व्यापारी आत्महत्या करणार होता

व्यापाऱ्यासोबत महिलेने बनवला अश्लील व्हिडिओ

पीडित मार्बल व्यापाऱ्याने पोलिसांना सांगितले की, गुणवती येथील रेखा कंवर आणि शैतान सिंग यांनी त्याचा अश्लिल व्हिडिओ बनवला आणि तो व्हायरल करण्याची धमकी देऊन २३ लाख रुपये हडप केले. वास्तविक, रेखा हि तिचा पती विक्रमसिंह सोबत झोपडीसारख्या घरात राहत होती. त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट होती. रेखाला अलिशान जीवन जगायचे होते. त्याचवेळी मार्बल कंपनीत स्टोन कटरचे काम करणारा विक्रमसिंह आपल्या बायकोच्या इच्छा पूर्ण करू शकत नव्हता.

23 लाख केले वसूल

पतीच्या गरिबीला कंटाळून रेखाने तिच्या सौंदर्याला शस्त्र बनवून पैसे कमविण्याचा प्लॅन केला. तीन वर्षांपूर्वी ती एका मार्बल व्यापाऱ्याच्या संपर्कात आली आणि तिने हळूहळू त्या व्यापाऱ्याला सौंदर्याच्या जाळ्यात अडकवले. रेखाचा मित्र शैतान सिंग याने या कटाला पाठिंबा दिला. रेखाने मार्बल व्यापाऱ्यासोबत शारीरिक संबंध असताना व्हिडिओ शूट केला आणि शैतान सिंगच्या माध्यमातून ब्लॅकमेल (Blackmail) करण्यास सुरुवात केली. व्यावसायिकाने त्याला आधी २३ लाख रुपये दिले. असे असूनही रेखाचा लोभ वाढतच गेला. त्यानंतर पुन्हा ५० लाखांची मागणी केली.

महिलेसह ३ जणांना अटक

या सर्व ब्लॅकमेलिंग आणि धमक्यांना कंटाळून व्यावसायिकाने आत्महत्येचा मार्ग निवडला. तत्पूर्वी, त्याने आपल्या बहिणीला हा सर्व प्रकार सांगितला, त्यानंतर दोन्ही भाऊ-बहीण पोलिस स्टेशनमध्ये पोहोचले आणि प्रकरणाची माहिती देत ​​महिला आणि तिच्या साथीदारांविरुद्ध तक्रार दाखल केली. सध्या पोलिसांनी आरोपी रेखा, तिचा मित्र शैतान सिंह आणि पती विक्रम सिंह यांना अटक केली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com