नांदेडमध्ये रक्ताचा सडा! गँगवारच्या २४ तासांतच पुन्हा एक हत्या, शहरात दहशतीचे वातावरण

Nanded Second Murder Within 24 hours Gangwar Terror: नांदेडमध्ये गँगवारनंतर २४ तासांतच पुन्हा एका तरुणाची निर्घृण हत्या. सलग होत असलेल्या खुनांमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस तपास सुरू आहे.
Heavy police deployment in Nanded after back-to-back murders triggers fear across the city.
Heavy police deployment in Nanded after back-to-back murders triggers fear across the city.Saam Tv
Published On

संजय सूर्यवंशी, साम टीव्ही

शहरात गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या हिंसाचारामुळे नांदेड हादरले आहे. शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या गँगवारमध्ये तीन गुंडांच्या खुनाची घटना ताजी असतानाच, शनिवारी रात्री पुन्हा एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. मुरमुरा गल्ली परिसरात झालेल्या या हत्याकांडामुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रज्जू ऊर्फ रणजितसिंग तबेलेवाले (वय ३२) असे मृताचे नाव आहे. शनिवारी रात्री उशिरा मुरमुरा गल्ली भागात दोन इसमांनी रणजितसिंगवर तलवारीने सपासप वार केले. हा हल्ला इतका भीषण होता की, रज्जूचा जागीच मृत्यू झाला. जुन्या वादातून ही हत्या झाली असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

Heavy police deployment in Nanded after back-to-back murders triggers fear across the city.
Crime: १९ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार, घरी जाताना अपहरण करत फ्लॅटवर नेलं अन्...; पीडितेचा आत्महत्येचा प्रयत्न

घटनेची माहिती मिळताच वजीराबाद पोलिसांनी वेगाने चक्रे फिरवून दोघा संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. शुक्रवारी झालेल्या तिहेरी खुनातील आरोपींचा पोलीस शोध घेत असतानाच ही दुसरी घटना घडल्याने पोलीस दलावरही मोठा ताण निर्माण झाला आहे.

Heavy police deployment in Nanded after back-to-back murders triggers fear across the city.
Crime: बायकोचे अनैतिक संबंध असल्याचा संशय, डोक्यात सिलिंडर घालत नवऱ्याने जागीच संपवलं

शुक्रवारी मध्यरात्री गँगवारमध्ये तीन जणांचा बळी गेला होता. त्या घटनेला २४ तास उलटत नाहीत तोच शनिवारी पुन्हा हत्या झाल्याने नांदेडकरांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सलग होत असलेल्या या खुनाच्या सत्रामुळे गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरला आहे का? असा सवाल आता नागरिक विचारत आहेत. सध्या वजीराबाद पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, शहरात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com