शाळेच्या मध्यंतरानंतर थरार! विद्यार्थ्याला निर्जनस्थळी नेऊन गळ्यावर अन् पोटावर वार

Class 10 Student Stabbed After Cricket Argument In Nanded School: नांदेडमध्ये शाळेजवळ 10वीतील विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; क्रिकेटच्या किरकोळ वादातून घडली धक्कादायक घटना, आरोपी विद्यार्थी ताब्यात
Nanded: Injured Class 10 student rushed to hospital after knife attack near school premises
Nanded: Injured Class 10 student rushed to hospital after knife attack near school premisessaam tv
Published On

संजय सूर्यवंशी, साम टीव्ही

नांदेड: क्रिकेट खेळण्यावरून झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर थेट चाकू हल्ल्यात झाल्याची धक्कादायक घटना नांदेड शहरा लगत असलेल्या असर्जन येथील शंकरराव चव्हाण विद्यालयात घडली आहे. या हल्ल्यात 16 वर्षीय इयत्ता 10 वीतील विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना शनिवारी शाळेच्या मध्यंतरानंतर घडली. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी शाळेत क्रिकेट खेळण्यावरून विद्यार्थी दोन गटांमध्ये वाद झाला होता. हा वाद तिथेच मिटला असल्याचे दिसत असले तरी तो मनात धरून ठेवण्यात आला होता.

Nanded: Injured Class 10 student rushed to hospital after knife attack near school premises
Mumbai : मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली! पाणी पुरवठा करणाऱ्या महत्त्वाच्या २ धरणांच्या पातळीत वाढ

आज सोमवारी शाळेच्या मध्यंतरानंतर आरोपी असलेल्या दोन विद्यार्थ्यांनी जखमी विद्यार्थ्याला शाळेजवळील शिव मंदिराच्या पाठीमागील निर्जनस्थळी नेऊन त्याच्यावर चाकूने हल्ला केला. हल्लेखोरांनी त्याच्या गळ्यावर आणि पोटात चाकूने वार केले. रक्तबंबाळ अवस्थेत विद्यार्थी खाली कोसळताच आरोपी तेथून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच शाळा प्रशासन आणि स्थानिक नागरिकांनी जखमीला तातडीने विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. सध्या त्याच्यावर उपचार सुरु असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

Nanded: Injured Class 10 student rushed to hospital after knife attack near school premises
Fake Currency : भरधाव कार थांबवली अन पोलिसांचे डोळेच पांढरे झाले! बनावट नोटांच्या मोठ्या रॅकेटचा अहिल्यानगरमध्ये पर्दाफाश

घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन्ही आरोपी विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले आहे. अल्पवयीन असल्याने त्यांना बालसुधारगृहात पाठवण्याची प्रक्रिया सुरु आहे. एका किरकोळ कारणावरून विद्यार्थ्यांनी केलेल्या या टोकाच्या पावलामुळे पालक आणि शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शाळेत सुरक्षा वाढवण्याची मागणी जोर धरत आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com