अभिजीत दिपकेंची प्रकृती बिघडली; भेटीगाठी घेत असतानाच घाईघाईनं घरात गेले, तातडीने डॉक्टर पोहोचले

Abhijeet Dipke Health Scare Vomiting Sambhajinagar: कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांची तब्येत अचानक बिघडली. संभाजीनगरमध्ये समर्थकांशी संवाद साधताना त्यांना उलटीचा त्रास झाला. डॉक्टरांनी घरी धाव घेत सलाईन लावले.
Abhijeet Deepke sudden illness during supporter meeting
Abhijeet Deepke sudden illness during supporter meetingsaam tv
Published On

कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांची तब्येत शनिवारी अचानक बिघडली. छत्रपती संभाजीनगरमधील त्यांच्या निवसस्थानाबाहेर समर्थकांची संवाद साधत असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागले आणि त्यांनी उलटी केली. मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी सुमारे 11:45 वाजता दीपके आपल्या घराच्या पार्किंगमध्ये जमलेल्या समर्थकांना भेटण्यासाठी खाली आले होते. यावेळी त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर ते घराच्या मागील बाजूस गेले, त्यांना तिथे उलटी झाली.

Abhijeet Deepke sudden illness during supporter meeting
मोठी बातमी! माजी खासदार विनायक राऊतांच्या अडचणी वाढल्या, कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता, मोठी अपडेट समोर

25 जुलै रोजी नवी दिल्लीतील जंतर-मंतर येथे झालेल्या आंदोलनादरम्यान अभिजीत दीपके यांनी स्वतःला टायफॉइड झाल्याची माहिती दिली होती. काही दिवसांपासून प्रकृती ठीक नसून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यामध्ये त्यांना नियमितपणे सलाईन दिले जात असल्याचेही त्यांनी सांगितले होते. आजारी असूनही, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू असलेले आंदोलन थांबवणार नसल्याची भूमिका त्यांनी यावेळी स्पष्ट केली होती.

Abhijeet Deepke sudden illness during supporter meeting
Maharashtra Politics: राज ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वी मनसेला मोठा धक्का, बड्या नेत्यासह पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी राजीनामे

अभिजीत दीपके यांनी कॉक्रोच जनता पार्टीच्या माध्यमातून देशभरात नीट परीक्षाफुटीविरोधात मोठे आंदोलन उभारले होते. या आंदोलनाला देशभरातून विशेषतः Gen-Z ने मोठा प्रतिसाद देत दिल्लीच्या जंतर-मंतरवर आंदोलन केले. तसेच देशातील प्रमुख शहरांमध्ये देखील सरकारच्या निषेधार्थ तरुणाई रस्त्यावर उतरली होती. अखेर सरकारला या तरुणां समोर झुकावं लागलं आणि शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावाच लागला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com