Nanded News
Nanded NewsSaam tv

Nanded : अमित देशमुख यांच्या साखर कारखान्याला हरित लवादाचा दणका; नियमांचे उल्लंघन केल्याने १ कोटी १३ लाखाचा दंड

Nanded News : साखर कारखाना सुरु असताना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने काही नियम अटी आखून दिल्या. या नियमांचे पालन करणे साखर कारखान्यांना बंधनकारक आहे. अर्थात हे नियम सर्वच साखर कारखान्यांना लागू
Published on

संजय सूर्यवंशी 
नांदेड
: नांदेडच्या लोहा तालुक्यातील शिवनी (जामगा) येथील अमित देशमुख चेअरमन असलेल्या साखर कारखान्याला राष्ट्रीय हरित लवादाने दणका दिला आहे. या कारखान्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ समितीच्या पत्रातील अटीची पूर्तता न केल्याने दंड ठोठावला असून दोन महिन्यात १ कोटी १३ लाख ४० हजार रुपयांचा दंड भरण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय शेतकऱ्यांना भरपाई देण्याचे देखील आदेश दिले आहेत. 

साखर कारखाना सुरु असताना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने काही नियम अटी आखून दिल्या आहेत. या आखून दिलेल्या नियमांचे पालन करणे साखर कारखान्यांना बंधनकारक आहे. अर्थात हे नियम सर्वच साखर कारखान्यांना लागू आहेत. दरम्यान नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यात असलेल्या शिवनी येथील साखर कारखान्याने या नियमांचे उल्लंघन केले आहे. या साखर कारखान्यावर आमदार अमित देशमुख हे चेअरमन आहेत. 

Nanded News
Crime News : शतपावली करणाऱ्या वृद्धाला धक्के देत पाडले; दोन तोळ्याची सोन्याची चैन हिसकावून काढला फळ, तिघे पोलिसांचा ताब्यात

२०२३ साली शेतकऱ्यांनी दाखल केली याचिका 

दरम्यान साखर कारखान्यातून निघत असलेली राख व दूषित पाणी याबाबत शेतकऱ्यांनी राष्ट्रीय हरित लवादाच्या पश्चिम खंडपीठात २०२३ साली याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी झाल्यानंतर अखेर शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय आल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. काँग्रेसचे नेते माजी मंत्री अमित देशमुख यांच्या कारखान्याला तब्बल १ कोटी १३ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. 

Nanded News
Jalna Crime : संशयिताला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीसांवर दगडफेक; जालन्यातील गोंदी तांडा येथील घटना, दोन कर्मचारी जखमी

३१ शेतकऱ्यांना भरपाईचे आदेश 

दरम्यान पर्यावरण पूरक नियमाचे उल्लंघन केल्याने १ कोटी १३ लाख ४० हजार रुपयांचा दंड कारखान्याला आकारण्यात आला आहे. तसेच या कारखान्याची राख आणि दुषीत पाण्यामुळे या परिसरातील शेती पिकाचे नुकसान झाले होते. शेती पिकाच्या झालेल्या नुकसानी बद्दल परिसरातील ३१ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून ५४ लाख ४३ हजार ९५५ रुपये देण्याचे आदेश देखील दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com