Crime News : शतपावली करणाऱ्या वृद्धाला धक्के देत पाडले; दोन तोळ्याची सोन्याची चैन हिसकावून काढला फळ, तिघे पोलिसांचा ताब्यात

Mumbai News : विजय नगर सोसायटी समोरील फूटपथावरून चालत असताना तीन अज्ञातांनी त्यांना धक्का दिला. धक्का का मारला हे विचारल्यानंतर त्यांच्या कानफाटात मारून त्यांच्या गळ्यातील दोन तोळ्याची सोन्याची चैन घेऊन तिघेही फरार झाले
Crime News
Crime NewsSaam tv
Published On

संजय गडदे
मुंबई
: रस्त्याने पायी चालणे देखील आता कठीण झाले आहे. महिलांच्या गळ्यातील चैन तोडून पसार झाल्याच्या घटना घडल्या आहेत. अशात आता मुंबईच्या अंधेरी पूर्वेकडील विजयनगर सोसायटी समोरील फुटपाथवरून रात्री शतपावली करणाऱ्या वृद्धाला धक्का मारुन त्यांच्या गळ्यातील दिड लाखांची दोन तोळ्याची सोन्याची तोडून चोरटे पसार झाले होते. या तीन आरोपींना अंधेरी पोलिसांनी मुंब्रा येथून अटक केली आहे. 

अंधेरी पूर्वेकडील सहारा रोड कोल डोंगरी परिसरात राहणारे शंकर जयराम जोशी हे रात्री जेवण करून रोज फिरण्यासाठी जात होते. नेहमीप्रमाणे रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास विजय नगर सोसायटी समोरील फूटपथावरून चालत असताना तीन अज्ञातांनी त्यांना धक्का दिला. धक्का का मारला हे विचारल्यानंतर त्यांच्या कानफाटात मारून त्यांच्या गळ्यातील दोन तोळ्याची सोन्याची चैन घेऊन तिघेही फरार झाले होते. 

Crime News
Almatti Dam : अलमट्टी धरणाच्या उंचीविरोधात चक्काजाम आंदोलन; सांगली कोल्हापूर मार्गावर पोलीस बंदोबस्त तैनात

३०० सीसीटीव्ही फुटेजची तपासणी 

घडल्या प्रकारानंतर त्यांनी अंधेरी पोलिसांत जात तिन्ही तरुणांविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा नोंद केला होता. दरम्यान परिमंडळ १० चे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त शशिकांत भोसले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे, पो. नि. विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तपास सुरु केला. घटनास्थळासह अंधेरी स्थानक परिसरातील सुमारे २५० ते ३०० हून अधिक सीसीटिव्ही फुटेजची तपासणी करुन पोलिसांनी आरोपीची ओळख पटविली.

Crime News
Jalna Heavy Rain : परतूर मंठा तालुक्यात मुसळधार अवकाळी पाऊस; शेतातही साचले पाणी

तिघांना मुब्रा येथून घेतले ताब्यात 
दरम्यान सीसीटीव्ही फुटेजवरुन तिन्ही आरोपी वाकोला जंक्शन येथून एका गाडीत बसल्याचे दिसून आले. त्यानंतर या कार चालकाची माहिती काढून पोलिसांनी कार बुक करणाऱ्या व्यक्तीची माहिती काढली. माहितीनंतर पोलिसांनी मुंब्रा येथून वसीम शेख, शहिद शेख आणि तौफिक इंद्रीसी या तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यांनीच गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरीची सोनसाखळी पोलिसांनी हस्तगत केली आहे. चौकशीत ते तिघेही मुंब्रा येथील असून त्यांचा हा पहिलाच गुन्हा आहे. अटकेनंतर या तिघांनाही अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com