Jalna Crime : संशयिताला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीसांवर दगडफेक; जालन्यातील गोंदी तांडा येथील घटना, दोन कर्मचारी जखमी

Jalna News : जालना जिल्ह्यातील गोदी तांडा येथे चोरीचा गुन्हा दाखल असलेल्या संशयित आरोपींना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचे पथक गेले होते. या पथकावर व गाडीवर अचानकपणे दगडफेक करण्यात आली
Jalna Crime
Jalna CrimeSaam tv
Published On

अक्षय शिंदे 
जालना
: जालन्यात संशयित आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर दगडफेक करण्यात आल्याची घटना जालन्यातील गोंदी तांडा येथील घडली आहे. या दगडफेकीमध्ये दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहे. जखमी पोलीस कर्मचार्याना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून या प्रकरणी सात संशयितांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

जालना जिल्ह्यातील गोदी तांडा येथे चोरीचा गुन्हा दाखल असलेल्या संशयित आरोपींना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचे पथक गेले होते. या पथकावर व गाडीवर अचानकपणे दगडफेक करण्यात आली. दगडफेक करण्यात एका महिलेसह दोन पुरुषांचा सहभाग आहे. दरम्यान अचानक झालेल्या दगडफेकीमध्ये आशोक नागरगोजे आणि शाकेर सिद्दिकी हे दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या शहागड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहे. 

Jalna Crime
Jalna Heavy Rain : परतूर मंठा तालुक्यात मुसळधार अवकाळी पाऊस; शेतातही साचले पाणी

सात जणांवर गुन्हा दाखल 

दोन पुरुषासह एका महिलेने पोलिसांच्या खाजगी गाडीवर आणि पोलिसांवर दगडफेक केली आहे. या दगडफेकीमध्ये दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले असून पोलिसाच्या खाजगी वाहनांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान या प्रकरणी संशयित सात आरोपीं विरोधात गोंदी पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Jalna Crime
Crime News : शतपावली करणाऱ्या वृद्धाला धक्के देत पाडले; दोन तोळ्याची सोन्याची चैन हिसकावून काढला फळ, तिघे पोलिसांचा ताब्यात

जुन्या वादातून तरुणाला लोखंडी रॉडने मारहाण
नांदेड
: नांदेड शहरातील भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत काल रात्री उशिरा दुचाकीवर आलेल्या तिघांनी निलेश कल्याणकर यांना मारहाण केली आहे. निलेश कल्याणकर आणि त्याचा मित्र पायी चालत असताना तिघांनी दुचाकीवरून उतरून रॉडने मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. याप्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात तीन आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com