Nanded News : भरउन्हात पाणी भरलं, मळमळ अन् अस्वस्थपणा जाणवू लागला; नांदेडमध्ये उष्माघाताने महिलेचा घरातच मृत्यू

Woman Dies of Heatstroke : उष्माघातामुळे उलटी व जुलाब झाल्याने लक्ष्मीबाई यांचा मृत्यू झाल्याची वैद्यकीय सूत्रांनी माहिती दिली आहे. स्थानिक नागरिकांनी तातडीने इस्लामपूर आरोग्य केंद्रात महिलेला उपचारासाठी दाखल केले.
Kinwat Islampur taluka woman died of heatstroke
Kinwat Islampur taluka woman died of heatstroke Saam Tv News
Published On

नांदेड : राज्यात उन्हाचा चांगलाच तडाका बसत आहे. बाहेर निघाल्यानंतर शरिराची अक्षरश: लाही लाही होत आहे. त्याचदरम्यान, नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात इस्लामपूर येथे उष्माघाताने एका महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लक्ष्मीबाई चिंतलावाड (वय ६५) असं या महिलेचं नाव आहे. दुपारी भरउन्हात पाणी भरल्यानंतर त्यांना मळमळ आणि अस्वस्थपणा जाणवू लागला. तर उष्माघातामुळे उलटी व जुलाब झाल्याने लक्ष्मीबाई यांचा मृत्यू झाल्याची वैद्यकीय सूत्रांनी माहिती दिली आहे. स्थानिक नागरिकांनी तातडीने इस्लामपूर आरोग्य केंद्रात महिलेला उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं.

दरम्यान, बुलढाण्यातील जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. पीक परिस्थिती, पाऊस तसेच सामाजिक, आर्थिक आणि देशाच्या राजकीय, संरक्षण परिस्थितीचा अंदाज सांगणारी विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली भेंडवळची घटमांडणी आज अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर केली. तर भाकित उद्या १ मे ला पहाटे वर्तविण्यात येणार आहे.

Kinwat Islampur taluka woman died of heatstroke
Amul Milk Price Hike : सर्वसामान्यांना मोठा झटका; मदर डेअरीनंतर अमुलचे दूध महागले, जाणून घ्या नवे दर

पीक परिस्थितीचा अंदाज, अतिवृष्टी, दुष्काळ, देशाची आर्थिक परिस्थिती, राजकीय भाकीत, पृथ्वीवर येणारी संकटे, परकीय शत्रूपासून होणारे धोके अशा अनेक प्रश्नांचे अंदाज मांडणाऱ्या भेंडवळ मांडणीच्या भाकिताकडे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले असते. या घटमांडणीचे भाकीत उद्या म्हणजे १ मे रोजी सूर्योदयापूर्वी भाकित सांगितले जाईल. यामुळे सामान्य जनतेत मांडणीची प्रचंड उत्सुकता असते. हे भाकित ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने शेतकरी, राजकीय नेते, व्यापारी यांच्यासह गावकरी येतात.

जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ गावामध्ये दरवर्षी घटमांडणी केली जाते त्यानंतर भविष्य वर्तवले जाते. गेल्या ३५० वर्षांपासून वाघ परिवार परंपरेनुसार घटमांडणी करतात आणि भाकित सांगतात. भेंडवळच्या वाघ कुटुंबाने सुरू केलेली ही परंपरा सध्या त्यांचे वशंज चंद्रभान महाराज वाघ यांनी सुरू ठेवली आहे. घटमांडणीच्या दुसऱ्या दिवशी वर्तवलेल्या भाकिताला खूप महत्व असते. या घटमांडणीतून जे भाकित सांगितले जाते त्यामध्ये शेती, पीक, पर्जन्यमान, देशाचे संरक्षण, युद्ध, महापूर आणि राजकीय परिस्थिती या सारख्या महत्वाच्या विषयांवर अंदाज वर्तवला जातो.

Kinwat Islampur taluka woman died of heatstroke
Vijaysingh Nalawade : पुणे जिल्हा परिषदेचे वादग्रस्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी, विजयसिंह नलावडे यांची बदली; नेमकं प्रकरण काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com