Nanded Crime: बायकोचा वारंवार छळ, बंदूक रोखल्याचा आरोप; नांदेडमध्ये तहसीलदाराला अटक

Chandrapur Tehsildar Arrested: चंद्रपूरच्या तहसीलदाराला नांदेड पोलिसांनी अटक केली आहे. बायकोचा छळ केल्याप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या तहसीलदारावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
Nanded Crime
Chandrapur Tehsildar ArrestedSaam Tv
Published On

संजय सूर्यवंशी, नांदेड

नांदेडमध्ये पत्नीचा छळ केल्याप्रकरणी तहसीलदाराला अटक करण्यात आली आहे. शेंबटवाड असं या तहसीलदाराचे नाव असून ते चंद्रपूर जिल्ह्यात कार्यरत आहेत. मुलबाळ होत नाही म्हणून तहसीलदार पत्नीचा वारंवार छळ करून तिला मारहाण करत होता असा आरोप करण्यात आला आहे. त्याचसोबत पत्नीच्या डोक्यावर बंदूक रोखून तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप तहसीलदारावर आहे. नांदेडमध्ये सासरवाडीत आल्यानंतर पोलिसांनी अविनाश यांना अटक केली. दीड वर्षांपूर्वीच अविनाश यांचे नांदेडमधील तरुणीसोबत लग्न झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, मानसिक, शारिरीक आणि आर्थिक छळ करून पत्नीवर बंदूक रोखून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या तहसीलदाराला नांदेड पोलिसांनी अटक केली. चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदुरचे तहसीलदार शेंबटवाड यांना शिवाजीनगर पोलिसांनी शनिवारी रात्री अटक केली. त्याच्या पत्नीने त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहे. यासंदर्भात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी अटकेची कारवाई केली.

Nanded Crime
Mumbai Crime: शिक्षकाचं धक्कादायक कृत्य! शाळेतच महिला शिक्षिका अन् विद्यार्थिनींचा करायचा विनयभंग, रात्री-अपरात्री कॉल

तहसीलदार यांच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरुन शिवाजीनगर पोलिस ठाण्यामध्ये त्यांच्यासह दोन डॉक्टर्स, सासू, सासरे यांच्याविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेनंतर तहसीलदार यांना कोर्टात हजर करण्यात आले. पोलिसांनी तहसीलदार यांना पोलिस कोठडी देण्यात यावी अशी मागणी केली होती. पण कोर्टाने तहसीलदाराची रवानगी न्यायालीन कोठडीमध्ये केली आहे. तहसीलदार यांना अटक करण्यात आल्यामुळे नांदेड आणि चंद्रपूरमध्ये खळबळ उडाली आहे.

Nanded Crime
Crime : थोरल्याशी वाद, धाकट्याचा खून! ६ जणांनी अपहरण केलं अन् तरूणाचा जीव घेतला, अहिल्यानगर हादरले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com