Mumbai Crime: शिक्षकाचं धक्कादायक कृत्य! शाळेतच महिला शिक्षिका अन् विद्यार्थिनींचा करायचा विनयभंग, रात्री-अपरात्री कॉल

Teacher Perverted Behaviour Unmasked: मुलुंडमधील एका शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकाने शाळेतील महिला शिक्षिका आणि विद्यार्थिनींचा विनयभंग केला. तसंच मोबाइल नंबर घेऊन त्यांना रात्री-अपरात्री कॉल करून शिवीगाळ केला.
Mumbai Crime: शिक्षकाचं धक्कादायक कृत्य! शाळेतच महिला शिक्षिका अन् विद्यार्थिनींचा करायचा विनयभंग, रात्री-अपरात्री कॉल
Teacher's Perverted Behaviour UnmaskedSaam Tv
Published On

मयूर राणे, मुंबई

मुलुंडमधील एका शाळेमध्ये शिक्षकानेच महिला शिक्षिका आणि विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याची धक्कादायक प्रकार घडला आहे. शाळेतच हा विकृत शिक्षक महिला शिक्षिका आणि विद्यार्थिनींना टार्गेट करायचा. त्यांच्याकडून मोबाइल नंबर घेऊन रात्री-अपरात्री त्यांना कॉल करून त्रास द्यायचा. या शिक्षकाच्याविरोधात मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी शाळेमध्ये राडा केला.

मिळालेल्या माहितीनुसार, मुलुंडमधील मुंबई पब्लिक स्कूलमध्ये एका विकृत शिक्षकाने शाळेतील शिक्षिकांना रात्री १२ च्या नंतर फोन करून शिवीगाळ करत अश्लील शब्द वापरले. त्याचसोबत त्याने शाळेतील विद्यार्थिनींची छेड काढण्याचा प्रकार देखील समोर आला आहे. या विकृत शिक्षकाला मुंलुंडमधील मनसे कार्यकर्त्यांनी चांगलाच चोप दिला.

Mumbai Crime: शिक्षकाचं धक्कादायक कृत्य! शाळेतच महिला शिक्षिका अन् विद्यार्थिनींचा करायचा विनयभंग, रात्री-अपरात्री कॉल
Crime News: मित्रांसोबतचे फोटो काढून ब्लॅकमेलिंग, कॉलेजच्या वर्कशॉपमध्ये बोलावून विद्यार्थिनींसोबत नको ते कृत्य, जवळ बसवून...

शाळेमधील शिक्षकाचे कृत्य ऐकून संतप्त झालेल्या मनसैनिकांनी शाळेत जाऊन राडा केला. मनससैनिकांनी याप्रकरणी आज शाळेत जाऊन या मॅनेजमेंटला धारेवर धरत शिक्षकाला चांगलाच धडा शिकवला. या शिक्षकाला चोप देत त्याच्या तोंडावर कोळसा फेकून मारला. याप्रकरणी मुलुंड पोलिसांनी या विकृत शिक्षकाला ताब्यात घेतले असून अधिक तपास पोलिस करत आहेत.

Mumbai Crime: शिक्षकाचं धक्कादायक कृत्य! शाळेतच महिला शिक्षिका अन् विद्यार्थिनींचा करायचा विनयभंग, रात्री-अपरात्री कॉल
Crime : थोरल्याशी वाद, धाकट्याचा खून! ६ जणांनी अपहरण केलं अन् तरूणाचा जीव घेतला, अहिल्यानगर हादरले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com