Ranveer Allahbadia: रणवीर अल्लाहबादिया पुन्हा अडकणार? पोलिसांनी लावला गंभीर आरोप, प्रकरण काय?

Ranveer Allahbadia: प्रसिद्ध यूट्यूबर आणि पॉडकास्टर रणवीर अल्लाहबादिया उर्फ बीयरबाइस याच्यावर 'India’s Got Talent' शोशी संबंधित वादात अडचणीत सापडल्याची माहिती समोर आली आहे.
Ranveer Allahbadia
Ranveer Allahbadiasocial media
Published On

Ranveer Allahbadia: प्रसिद्ध यूट्यूबर आणि पॉडकास्टर रणवीर अल्लाहबादिया उर्फ बीयरबाइस याच्यावर 'India’s Got Talent' शोशी संबंधित नविन वादात सापडल्याची माहिती समोर आली आहे. रिपोर्ट्सनुसार, सायबर पोलिसांनी तपासासाठी रणवीरला सहकार्य करण्याचे आवाहन केले होते, मात्र त्याच्यावर सहकार्य न करण्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणाची सुरुवात India’s Got Talent या शोमध्ये केलेल्या काही वादग्रस्त वक्तव्यांपासून झाली. शोमध्ये रणवीरने आईवरुन अपमानास्पद टिपणी केल्यामुळे या वादाला सुरुवात झाली. यामुळे शोशी संबंधित व्यक्तींकडून तक्रार करण्यात आल्या आणि पोलिसांनी या संदर्भात तपास सुरू केला.

Ranveer Allahbadia
Khatron ke Khiladi 15: 'खतरों के खिलाडी' संकटात! रोहित शेट्टी नाराज, निर्मात्यांची शोमधून घेतली माघार

सायबर पोलिसांनी रणवीरला चौकशीसाठी बोलावले होते, तसेच काही तांत्रिक माहिती आणि डेटा शेअर करण्याची मागणी केली होती. मात्र रिपोर्ट्सनुसार, रणवीरने ही माहिती देण्यास किंवा चौकशीत सहकार्य करण्यास टाळाटाळ केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्याच्या विरोधात कारवाईची शक्यता वाढली आहे.

रणवीर अल्लाहबादिया हा सोशल मीडियावर अत्यंत लोकप्रिय आहे आणि त्याच्या पॉडकास्टवर अनेक मोठ्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली आहे. मात्र या नव्या प्रकरणामुळे त्याची प्रतिमा धोक्यात येण्याची शक्यता आहे. अद्याप रणवीरकडून यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. पोलिस तपास कशा दिशेने जातो आणि यामध्ये पुढे काय घडते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com