नांदेडमध्ये मध्यरात्री रक्तरंजित गँगवॉर; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याचा खून, राजकीय वर्तुळात खळबळ

Shiv Sena UBT Candidate Killed In Nanded Gang Clash: नांदेडमध्ये मध्यरात्री झालेल्या भीषण गँगवॉरमध्ये तिघांचा मृत्यू झाला असून ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याचाही यात समावेश आहे. रुग्णालयातही हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे.
Police investigate the crime scene after a deadly midnight gang war in Nanded that claimed three lives and triggered political tension.
Police investigate the crime scene after a deadly midnight gang war in Nanded that claimed three lives and triggered political tension.Saam Tv
Published On

संजय सूर्यवंशी, साम टीव्ही

नांदेड : शहरात काल मध्यरात्रीनंतर झालेल्या भीषण गँगवॉरमध्ये तिघांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. साई लाला आणि अर्जितसिंह चव्हाण या दोन गँगमध्ये हा संघर्ष झाला असून दोन्ही गटांतील सदस्य रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्यावर एमपीडीए अंतर्गतही गुन्हे दाखल आहेत.

Police investigate the crime scene after a deadly midnight gang war in Nanded that claimed three lives and triggered political tension.
By-Election: बारामती-राहुरी पोटनिवडणुकीत 'मविआ'चा धर्म की राष्ट्रवादीला साथ? उद्धव ठाकरे काय करणार?

मिळालेल्या माहितीनुसार, अर्जितसिंह चव्हाण आणि त्याचे दोन साथीदार ई-स्क्वेअर येथे ‘धुरंधर-2’ हा चित्रपट पाहून बुलेटवरून जात असताना साई लाला गँगच्या सदस्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. आधीपासूनच दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी तलवार आणि चाकूने अचानक हल्ला केला. या हाणामारीत अर्जितसिंह चव्हाण आणि सय्यद आवेज यांचा जागीच मृत्यू झाला.

Police investigate the crime scene after a deadly midnight gang war in Nanded that claimed three lives and triggered political tension.
Shaktipeeth Expressway New Route: शक्तीपीठ महामार्गाचा नवीन आराखडा; ९ गावांचा समावेश; कसा असणार मार्ग?

या घटनेत काही जण गंभीर जखमी झाले होते. जखमींना विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात आणखी एक धक्कादायक प्रकार घडला. जखमी महम्मद आवेज याला उपचारासाठी दाखल करत असताना अर्जितसिंह चव्हाणच्या भावाने त्याच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात आवेजचा मृत्यू झाला.

Police investigate the crime scene after a deadly midnight gang war in Nanded that claimed three lives and triggered political tension.
Accident CCTV : हवेत उडाला आणि वरचेवर गर्रकन फिरला; तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू, थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर

विशेष म्हणजे, मृत अर्जितसिंह चव्हाण हा महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 10 मधून उद्धव ठाकरे गटाचा उमेदवार होता. या घटनेमुळे राजकीय वर्तुळातही खळबळ माजली आहे. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. या दुहेरी हल्ल्याच्या घटनेमुळे नांदेड शहरात भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com