

Raigad News : रायगड जिल्ह्यातील दरड कोसळलेल्या इर्शाळवाडीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भेट दिली. त्यांनी त्याठिकाणच्या परिस्थितीची पाहणी केली व स्थानिक लोकांशी संवाद साधून दुर्घटनेची माहिती घेतली.
या घटनेतून सुखरूप वाचलेल्यांना नाना पटोले यांनी आधार दिला. सरकारने तातडीने लोकांचे पुनर्वसन करावे व त्यांना दररोज लागणाऱ्या सर्व प्रकारच्या वस्तुंची मदत पोहचेल याची व्यवस्था करावी असे पटोले म्हणाले. (Maharashtra News)
इर्साळवाडीतील दरड कोसळण्याची घटना अत्यंत दुःखद आहे. वेळीच या लोकांना सुरक्षित स्थळी हलवले असते तर नाहक बळी गेले नसते. पण सरकारने योग्यवेळी दखल घेतली नाही.
मागील ३-४ दिवसांपासून अतिवृष्टीचा इशारा दिला जात आहे. असं असताना धोकादायक, दरडप्रवण भागातील लोकांना सुरक्षितस्थळी हलवले असते तर अनेक जीव वाचले असते, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
आतातरी सरकारने जलदगतीने हालचाली करुन लोकांना सर्व प्रकारची मदत मिळेल याची व्यवस्था करावी. यावेळी नाना पटोले यांच्याबरोबर प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस प्रमोद मोरे, पनवेल जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सुदाम पाटील, नवी मुंबई जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अनिल कौशिक, रायगड युवक काँग्रेसचे अध्यक्ष हेमराज म्हात्रे होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.