Nagpur : धक्कादायक! धावत्या ट्रेनमध्ये महिलांचा विनयभंग, तक्रार करूनही पोलिसांची मदत नाही

Nagpur Crime News : दानापूर–सिकंदराबाद एक्सप्रेसमध्ये प्रवासादरम्यान नागपूरच्या काही महिलांचा विनयभंग झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे रेल्वेतील महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
NAGPUR WOMEN ALLEGE HARASSMENT IN DANAPUR–SECUNDERABAD EXPRESS, RAILWAY SAFETY CONCERNS RISE
NAGPUR WOMEN ALLEGE HARASSMENT IN DANAPUR–SECUNDERABAD EXPRESS, RAILWAY SAFETY CONCERNS RISESaam Tv
Published On
Summary
  • नागपूरच्या महिलांचा दानापूर–सिकंदराबाद एक्सप्रेसमध्ये विनयभंग

  • पोलिसांकडे तक्रार करूनही वेळेत मदत न मिळाल्याचा दावा

  • संतप्त महिलांनी नैनी रेल्वे स्थानकावर रेल रोको आंदोलन केले.

  • या घटनेमुळे रेल्वेतील महिला सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

पराग ढोबळे, नागपूर

महिलांच्या रेल्वे प्रवासाच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. देवदर्शन करून उत्तर प्रदेशातील वाराणसीहून नागपूरकडे परतणाऱ्या नागपूरमधील एका कुटुंबातील काही महिलांवर दानापूर–सिकंदराबाद एक्सप्रेसमध्ये प्रवासादरम्यान विनयभंग करण्यात आला. संतापजनक म्हणजे महिलांनी तक्रार करूनही पोलिसांनी तात्काळ कारवाई केली नसल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान या घटनेने प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला आपल्या कुटुंबीयांसह वाराणसी येथून नागपूरकडे परतत होत्या. त्यांची बुकिंग असल्याने त्या रिझर्व्हेशन डब्ब्यातून प्रवास करत होत्या. मात्र, गाडी सुटल्यानंतर डब्यात क्षमतेपेक्षा जास्त गर्दी झाल्याचे त्यांनी सांगितले. आरक्षित डब्यात मोठ्या प्रमाणात विनातिकीट प्रवासी शिरल्याने प्रवाशांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागला. महिलांच्या आरोपानुसार, गर्दीचा फायदा घेत काही प्रवाशांनी धक्काबुक्की केली, अश्लील शेरेबाजी केली तसेच विनयभंग केला.

NAGPUR WOMEN ALLEGE HARASSMENT IN DANAPUR–SECUNDERABAD EXPRESS, RAILWAY SAFETY CONCERNS RISE
Health Care : जेवल्या जेवल्या लगेच प्रचंड झोप येतेय? तुमच्या ताटातच दडलंय 'हे' मोठं कारण

या प्रकारामुळे महिला आणि त्यांच्या कुटुंबीयांना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागला. परिस्थिती गंभीर होत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी रेल्वे हेल्पलाइन १३९ वर संपर्क साधला. मात्र, तत्काळ आणि प्रभावी मदत मिळाली नसल्याचा दावा पीडित महिलांनी केला आहे. महिलांनी रेल्वे पोलीस तसेच स्थानिक पोलिसांकडेही तक्रार केल्याचे सांगितले आहे. मात्र, संबंधित यंत्रणांकडून वेळेत कारवाई झाली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. काही महिलांच्या म्हणण्यानुसार, आरोपींची ओळख स्वतःच पटवून द्यावी, असे उत्तरही त्यांना देण्यात आले. त्यामुळे संतापलेल्या महिलांनी अखेर नैनी रेल्वे स्थानकावर रेल्वे इंजिनासमोर जाऊन रेल रोको आंदोलन केले.

NAGPUR WOMEN ALLEGE HARASSMENT IN DANAPUR–SECUNDERABAD EXPRESS, RAILWAY SAFETY CONCERNS RISE
Monsoon Tips : पावसाळ्यात घरात पालींचा वावर वाढला? 'हे' उपाय वेळीच करा नाही तर...

दरम्यान, प्रवासादरम्यान छेडछाडीचे प्रकार सुरूच राहिल्याचा महिलांचा आरोप असून या घटनेमुळे रेल्वेतील महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. तसेच आरक्षित डब्यांमध्ये अनधिकृत प्रवाशांचा प्रवेश रोखण्यासाठी आणि महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com