दारूविरोधात महिलांचा रणशिंग; अवैध अड्ड्यांवर थेट कारवाई

Women Anti Liquor Movement In Nagpur Village: विषारी दारूमुळे पुण्यात अनेकांचे जीव गेले....मात्र नागपुरातील एका गावानं दारुविरोधी फौज उभारलीय... आणि त्यात महिलांचा विशेष सहभाग आहे... त्यामुळे दारुविरोधात महिला कमांडो कसा एकवटलेत..पाहूयात चांगभल विशेष....
Women commandos patrol Walni village in Nagpur, leading a powerful grassroots movement against illegal liquor.
Women commandos patrol Walni village in Nagpur, leading a powerful grassroots movement against illegal liquor.saam tv
Published On

दारूने हिरावलं कुंकू, महिलांनी उभारली दारूविरोधी फौज

महिला कमांडोंचा पहारा दारूविरोधात गावाची क्रांती

दारूमुळे उद्ध्वस्त संसार, महिलांचा गावासाठी पुढाकार

मुलांचं हरवलेलं बालपण आणि महिलांचा लढा

वलनी गावात दारूविरोधात महिला शक्ती

नागपूर जिल्हयातील वलनी गाव....संध्याकाळ झाली की या गावात गस्त सुरू होते ती महिला कमांडोंची... शक्ती महिला कमांडोच्या या महिला गावात फिरतात आणि जिथे जिथे अवैधपणे दारूचे अड्डे सुरू असल्याचे दिसले तर ते उध्दवस्त करतात...आज संपूर्ण गाव दारू मुक्त झालंय..शक्ती कमांडोज् च्या भीतीनं आता कुणी दारू दुकान सुरू करायला ही धजत नाही...

मात्र तीन वर्षांपूर्वी गावची परिस्थिती अशी नव्हती..दारूच्या व्यसनामुळे अनेक घर उध्द्वस्त झाली होती...अनेकांचे संसार उघड्यावर आले होते...अचानकपणे लहान मुलांची जबाबदारी अंगावर आल्यानं गावातल्या बायकांना मुलांचे पालनपोषण करण्यासाठी खूप झगडावं लागलं...दारूच्या व्यसनापायी वयाच्या तिशीतच पतीला गमावलेली जयश्री आता या शक्ती कमांडोची सदस्य आहे...हे कमांडो पथक तेव्हा असतं तर कदाचित आजची परिस्थिती वेगळी असती अशी व्यथा ती मांडते...या चाळीस महिलांच्या लढ्याला आता यश आलंय.. दारू बंद झाल्यानं गावाचं पूर्ण चित्रच पालटलंय..आता गावातल्या पुरूषांनाही शक्ती कमांडोचा अभिमान वाटतोय...

ही फक्त एका वलनी गावाची गोष्ट नाही...तर जिथे दारू आजही कुटुंबं उद्ध्वस्त करते अशा प्रत्येक गावासाठी हा एक संदेश आहे.. कारण कायदा दारूची दुकानं बंद करू शकतो... पण समाज बदलण्याची ताकद महिलांच्या संघटित शक्तीतच असते... आणि त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे हे शक्ती महिला कमांडो पथक....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com