Nagpur Accident : ट्रक-ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात, ४ जणांचा जागीच मृत्यू, १० जखमी

Nagpur truck-travel Road Accident : नागपूरमध्ये ट्रक आणि ट्रव्हल्सचा भीषण अपघात झालाय. यामध्ये चार जणांचा मृत्यू झालाय.
Nagpur truck-travel Road Accident
Nagpur truck-travel Road AccidentSaam TV
Published On

पराग ढोबळे, नागपूर प्रतिनिधी

Nagpur Accident : नागपूर जिल्ह्यात एक भीषण रस्ता अपघात झाला आहे. भरधाव येणाऱ्या ट्रव्हल्सने रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिली. या अपघातामध्ये चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अपघात इतका भीषण होता की ट्रव्हल्सची समोरील बाजूचे मोठं नुकसान झालेय. अपघात झाल्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी तात्काळ धाव घेत बचावकार्य केले. त्याशिवाय पोलिसांना याबाबतची माहितीही दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलेय.

नागपूर भिवापूररोडवर ट्रक आणि खासगी ट्रव्हल्सचा भीषण अपघात झाला आहे. उभ्या ट्रकला ट्रॅव्हल्सने जोरदार धडक दिली. ट्रकला धडक दिल्यानंतर ट्रव्हल्स बसच्या बाजूला असलेल्या हॉटेलमध्ये घुसली. त्यामुळे हॉटेलचेही मोठे नुकसान झालेय. ट्रव्हल्स आणि ट्रकच्या धडकेत चार जणांचा जागीच मृत्यू झाला. तर दहा पेक्षा जास्त जण जखमी आहे. जखमींवर जवळील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिस या घटनेचा तपास करत आहेत.

Nagpur truck-travel Road Accident
Nagpur Metro Ticket Price: नागपूर मेट्रोत ५ रुपयांत करता येणार प्रवास; चेक करा तिकीटांचे दर

अपघात नेमका कसा झाला?

नागपूरच्या तासगावाजवळ ट्रकला ट्रॅव्हल्सने धडक दिली. या भीषण अपघातात घटनास्थळीच चार जणांचा मृत्यू झाला आहे. या भीषण अपघातात ट्रक उलटला. ट्रॅव्हल्स भरधाव असल्यानं रस्त्या लगतच्या छोट्या टपरी हॉटेलमध्ये घुसली. त्यामुळे हॉटेल टपरी चालकाचं मोठं नुकसान झालं. यावेळी जखमीना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.

अपघातानंतर घटनास्थळी मोठ्या संख्येने आजू बाजूच्या गावातील नागरिकांनी गर्दी केली. उलटलेल्या ट्रकमध्ये धान्याचे पोते असल्यानं जेसीबीच्या साह्यानं हटवण्यात आले. यात नेमकं ट्रॅव्हलस चालकासोबत काय घडलं याचा तपास भिवापूर पोलीस करत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com