Sikkim Accident : भीषण दुर्घटना! सैन्य दलाचं वाहन ८०० फूट खोल दरीत कोसळलं, भारताच्या ४ जवानांचा जागीच मृत्यू, VIDEO

Sikkim Accident update: सिक्कीममध्ये सैन्य दलाचं वाहन ८०० फूट खोल दरीत कोसळल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातात भारताच्या ४ जवानांचा जागीच मृत्यू झाला आहे. ४ जवानांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
भीषण दुर्घटना! सैन्य दलाचं वाहन ८०० फूट खोल दरीत कोसळलं, भारताच्या ४ जवानांचा जागीच मृत्यू
Sikkim Accident Saam tv
Published On

नवी दिल्ली : सिक्किममध्ये भीषण दुर्घटना घडली आहे. सिक्कीमध्ये गुरुवारी भारतीय सैन्य दलाचं वाहन ७०० ते ८०० फूट खोल दरीत कोसळल्याची घटना घडली आहे. ही भीषण दुर्घटना सिक्कीमच्या पाकयोंग जिल्ह्यात घडली आहे. या दुर्घटनेत भारतीय सैन्य दलाच्या चार जवानांचा मृत्यू झाल्याची माहिती हाती आली आहे. या घटनेची माहिती मिळताच मदत कार्यास सुरुवात करण्यात आली आहे, 'आज तक'ने याबाबत वृत्त दिलं आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताचे चार जवान हे गुरुवारी पश्चिम बंगालच्या पेडोंग येथून सिक्कीमच्या (Sikkim) पाकयोंग जिल्ह्यातील सिल्ट मार्गे जुलुक येथे जात होते. याचवेळी रेंक रोंगली राज्य महामार्गावरील दलोपचंदजवळ सैन्य दलाची गाडी ७०० ते ८०० फूट दरीत कोसळली आहे. या भीषण दुर्घटनेत भारताच्या सैन्य दलाचे जेसीओ यांच्यासहित ४ जवानांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. भारताच्या ४ जवानांचा मृत्यू झाल्यानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

भीषण दुर्घटना! सैन्य दलाचं वाहन ८०० फूट खोल दरीत कोसळलं, भारताच्या ४ जवानांचा जागीच मृत्यू
Ghatkopar Hoarding Accident: मुलांना घराबाहेर जाऊ देऊ नको, पत्नीला केलेला कॉल ठरला शेवटचा; ठाण्यातल्या कुटुंबाचा आधारच हिरावला!

अपघातात (BIg Accident) मृत पावलेले जवान देशातील विविध भागातील आहेत. मृतांमध्ये मध्य प्रदेशचे चालक प्रदीप पटेल, मणिपूरचे शिल्पाकार डब्लू पीटर, हरियाणाचे नायक गुरुसेव सिंह आणि तमिळनाडूचे सुबेदार थंगापंडी यांचा समावेश आहे. चालकासहित सर्व मृतक सैन्य दलाचे जवान हे पश्चिम बंगालच्या बिनागुडीच्या एका युनिटमध्ये सेवेत होते.

भारतीय सैन्य दलाच्या ट्रकचा वेग अधिक असल्याने अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे भीषण अपघात झाला आहे. भारतीय सैन्य दलातील ४ जणांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. भारतीय सैन्याकडून शहीद जवानांचे पार्थिव त्यांच्या घरी पोहोचवण्याची व्यवस्था सुरु आहे. या भीषण अपघातात मृत्यू झाल्याची बातमी कळताच जवानांच्या घरी आणि गावात शोककळा पसरली. या घटनेने जवानांच्या कुटुंबीयांच्या सदस्यांवर दु:खाचा मोठा डोंगर कोसळला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com