दुर्गम भागांचा विकास संबंधी राष्ट्रीय नेतृत्वाचा दृष्टीकोन पुढे नेत भारतीय नौदलाने भारताच्या ईशान्येकडील राज्यांशी संपर्क मजबूत करण्यासाठी बहुआयामी संपर्क कार्यक्रम सुरू केला आहे.
खमरी मो सिक्कीम! (हॅलो सिक्कीम) ही मोटार कार मोहीम, महाराष्ट्रातील लोणावळा येथील INS शिवाजी येथून सिक्कीम पर्यंत 24 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर 23 या कालावधीत अनेक राज्यातून प्रवास करत 6500 किलोमीटरचे अंतर पार करणार आहे.
या मोहिमेत नौदल कर्मचाऱ्यांसह महिला अधिकारी आणि नेव्ही वेलफेअर अँड वेलनेस असोसिएशनच्या ( NWWA) सदस्यांचा समावेश आहे, जे 'नारी शक्ती'चे प्रदर्शन घडवतील'. संरक्षण सेवांमध्ये सिक्कीममधील तरुणांच्या सहभागाला प्रोत्साहन देणे, या प्रदेशात सागरी जागरूकता वाढवणे आणि राष्ट्र उभारणी मजबूत करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. (Latest Marathi News)
24 सप्टेंबर 23 रोजी आयएनएस (INS) शिवाजीचे कमांडिंग ऑफिसर, सीएमडीई,एनएम मोहित गोयल यांनी लोणावळा येथून या कार रॅलीला हिरवा झेंडा दाखवला. ही रॅली तीन टप्प्यांमध्ये काढली जाईल. पहिल्या टप्प्यात महू, झाशी, लखनौ, वाराणसी आणि बागडोगरा येथील थांब्यांचा समावेश आहे. दुसरा टप्पा गंगटोकपासून सिक्कीम पर्यंत असेल.
तिसरा टप्प्यात कोलकाता, भुवनेश्वर, विशाखापट्टणम, हैद्राबाद आणि पुण्याचा समावेश असेल. या कार रॅली दरम्यान, सहभागी व्यक्ती विविध शाळांमधील विद्यार्थ्यांशी, दिग्गजांशी संवाद साधतील तसेच संपर्क कार्यक्रम आणि जनजागृती मोहीम राबवतील. 22 दिवसांच्या नियोजित मोहिमेसाठी मेसर्स मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (इंधन भागीदार म्हणून) बरोबर भागीदारी केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.