New Jersey Akshardham
New Jersey AkshardhamSaam Tv

New Jersey Akshardham: अमेरिकेत बांधलं गेलं जगातली दुसरं सगळ्यात भव्य 'हिंदू मंदिर', पाहा व्हिडीओ...

America Temple: अमेरिकेत बांधलं गेलं जगातली दुसरं सगळ्यात भव्य 'हिंदू मंदिर', पाहा व्हिडीओ
Published on

New Jersey Akshardham:

अमेरिकेतील हिंदूंसाठी आता एक आनंदाची बातमी. येत्या ५ ऑक्टबरला अमेरिकेच्या न्यू जर्सीमध्ये अक्षरधाम मंदिरातचं लोकार्पण होणार आहे. हे मंदिर भारताच्या बाहेर असलेलं जगातलं दुसरं सगळ्यात मोठं हिंदू मंदिर असल्यामुळे या मंदिराला विशेष महत्त्व प्राप्त झालंय. नेमकं हे मंदिर कसं आहे, याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ..

अमेरिकेतील न्यू जर्सीमध्ये बनलेलं भव्य अक्षरधाम मंदिर फारच खास असणार आहे. या अक्षरधाम मंदिराला प्राचीन हिंदू धर्मग्रथांमध्ये जसं सांगितलं, अगदी तसंच साकारण्यात आलंय. या मंदिराचं डिझाईनही तसंच आहे.

New Jersey Akshardham
MP Assembly Election: केंद्रीय मंत्री विधानसभेच्या रिंगणात, मध्य प्रदेश निवडणुकीसाठी भाजपने जारी केली दुसरी यादी

या मंदिरात शेकडो मूर्ती आणि प्रतिमा लावण्यात आल्यात. या मूर्ती आणि प्रतिमांनी या मंदिराचं सौंदर्य आणखी वाढवलंय. शिवाय मंदिरात भारतीय संगीत. वाद्य आणि नृत्यांचाही सुंदर नजराणा कोरण्यात आलाय. प्राचीर भारतीय संस्कृतीची झलक या मंदिरात पाहायला मिळतेय. या मंदिरानं पौराणिक आणि ऐतिहासिक घटनांची आठवण उजागर केलीय. (Latest Marathi News)

न्यू जर्सीमधील अक्षरधाम मंदिर कंबोडियामील अंकोरवाट मंदिरानंतरच, म्हणजेच भारताबाहेर असणारं जगातलं दुसरं सगळ्यात मोठं मंदिर आहे. १२व्या शतकातलं भगवान विष्णू यांचं अंकोरवाटमधील हे मंदिर, जगातलं सगळ्यात मोठं आणि भव्य दिव्य मंदिर आहे. गहे मंदिर तब्बल ५०० एकर जागेत आहेत. युनेस्कोने या मंदिराला जागतिक तीर्थक्षेत्रांच्या यादीतही नोंदवलंय.

अक्षरधाम मधील मंदिराला अमेरिकेतील न्यू जर्सीमध्ये असलेल्या रॉबिन्सविल टाऊनशिपमध्ये साकारलं गेलंय. हे मंदिर अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरापासून ९० किलोमीटर दूर आहे. तर अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसी पासून जवळपास २८९ किलोमीटर अंतरावर आहे.

New Jersey Akshardham
Justin Trudeau News: 'जस्टिन ट्रुडो यांनी इतरांना दोष देण्याऐवजी स्वतः माफी मागावी', कॅनडाचे विरोधी पक्ष नेते का संतापले?

न्यू जर्सीतील हे अक्षरधाम मंदिर १२ वर्षांच्या अथक मेहनतीनंतर उभं राहिलंय. २०११ मध्ये या मंदिराचा पाया रचण्यास सुरुवात झाली होती. हे मंदिर साकारण्यासाठी १२ हजार ५०० पेक्षा जास्त लोकांनी दिवसरात्र मेहनत घेतलीय. अक्षरधाम मंदिराच्या प्रत्येक विटेवर एक गोष्ट आहे. अक्षरधाम मंदिरातील विटेमध्ये चुना, गुलाबी वाळू, संगमरवर आणि ग्रॅनाईट वापरण्यात आलं आहे. कडाक्याची थडी आणि उकाड्याचाही ही वीट सामना करण्यास सक्षम असल्याचं सांगण्यात येत आहे.

जगाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या घटकांमधून तयार झालेल्या विटांच्या मदतीने साकारलं गेलेलं हे भव्यदिव्य अक्षरधाम मंदिर... आता भक्तांसाठी लवकरच खुलं होणार आहे. अमेरिकेतील हे अक्षरधाम मंदिर जगभरातील भाविकांसाठी प्रमुख आकर्षण ठरलं, तर नवल वाटायला नको.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com