Justin Trudeau News: 'जस्टिन ट्रुडो यांनी इतरांना दोष देण्याऐवजी स्वतः माफी मागावी', कॅनडाचे विरोधी पक्ष नेते का संतापले?

India Canada Tensions Latest News: 'जस्टिन ट्रुडो यांनी इतरांना दोष देण्याऐवजी स्वतः माफी मागावी', कॅनडाचे विरोधी पक्ष नेते का संतापले?
Justin Trudeau News
Justin Trudeau NewsSaam Tv

India Canada Tensions Latest News:

भारतासोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो नव्या अडचणीत सापडले आहेत. कॅनडाचे विरोधी पक्षनेते पियरे पोलिव्हर यांनी म्हटले आहे की, ज्यूंची हत्या करणाऱ्या नाझींना पाठिंबा देणाऱ्यांचे सभागृहात स्वागत करून त्यांनी मोठी चूक केली आहे. त्यासाठी त्यांनी माफी मागितली पाहिजे.

कॅनडाचे पंतप्रधान ट्रुडो यांनी हिटलरच्या नाझी सैन्याच्या एका तुकडीचे सैनिक यारोस्लाव हँक यांची भेट घेऊन त्यांचे स्वागत केले होते. आता या मुद्द्यावरून ट्रुडोचे विरोधक त्यांना लक्ष्य करत आहेत.

Justin Trudeau News
Modi Government News: LPG स्वस्त केल्यानंतर मोदी सरकार देणार आणखी एक मोठं गिफ्ट, मध्यमवर्गीयांचा होणार फायदा...

पियरे म्हणाले, जस्टिन ट्रुडो यांची ही मोठी वैयक्तिक चूक आहे. कारण त्यांच्या कार्यालयाने सर्व पाहुण्यांची नावे निवडली होती आणि त्यांना आमंत्रित केले होते. ते म्हणतात की, जेव्हा युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की हाऊस ऑफ कॉमन्समध्ये आले, तेव्हा नाझी सैन्यात सेवा केलेल्या यारोस्लाव हँकसह अनेक लोकांना आमंत्रित केले होते. (Latest Marathi News)

जस्टिन ट्रुडोशिवाय कोणालाही यारोस्लावच्या पूर्वीच्या आयुष्याबद्दल माहिती नव्हती, असे ते म्हणाले. याबाबत कुणालाही सांगण्यात आले नाही. हाऊस ऑफ कॉमन्समध्ये त्यांचे स्वागत आणि कौतुक करण्यात आले. पण त्यांच्या काळ्या इतिहासाचे सत्य लपवून ठेव्यात आलं. आता ट्रुडो यांनी इतरांना दोष देणे थांबवावं आणि स्वतः माफी मागावी, असं पियरे म्हणाले.

Justin Trudeau News
Positive News: पाच वर्षाच्या पोरीनं मन जिंकलं, ५० वर्षाच्या महिलेला केले केस दान, गोष्ट वाचून तुम्हीही व्हाल थक्क

दरम्यान, 22 सप्टेंबर रोजी व्होलोडिमिर झेलेन्स्की यांनी कॅनडाच्या संसदेत भाषण दिले. त्याच वेळी, ९८ वर्षीय यारोस्लाव यांना सन्मानित करण्यात आले. स्पीकर अँथनी यांनी त्यांना युद्धनायक म्हटले होते. नंतर त्यांनी हिटलरच्या सैन्यातही काम केल्याचे उघड झाले. हुंकाचा सन्मान केल्याबद्दल स्पीकर रोटा यांनी माफी मागितली. ते म्हणाले, मला माझ्या निर्णयाचा खेद वाटतो. कॅनडाच्या खासदारांना युक्रेनच्या शिष्टमंडळाची पूर्ण माहिती नव्हती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com