>> मयुर सावंत
केस म्हणजे महिलांसाठी जीव की प्राण. पुरुषांपेक्षाही महिला आपल्या केसांची जास्त काळजी घेतात. दागिन्यांपेक्षाही त्या आपल्या केसांवर प्रेम करतात. अधिक आकर्षित दिसण्यासाठी केसात गजरा आणि फुल माळतात. हेच आभूषण असणारे केस.. जर तिच्या डोक्यावरून गळू लागले... तर तिच्यासाठी ही किती मोठी अस्वस्थ करणारी गोष्ट आहे. याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही.
अशातच अवघ्या पाच वर्षांच्या चिमुरडीनं एका कॅन्सर पेशन्टला आपले केस दान केलेत. त्यामुळं तिच्यावर कौतुकाचं वर्षाव केला जातोय. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिच्या पालकांनीच तिचे केस दान करण्यास भाग पाडलं.
अनुसुया घोष असं या चिमुरडीचं नाव. ही मूळची त्रिपुरातली आहे. अनुसुया आणि तिच्या आईनं सोशल मीडियावर एक पोस्ट पाहिली. ही पोस्ट एका कन्सर संबंधित पेशन्टची होती. एका ५० वर्षीय महिलेला कॅन्सर झाला होता आणि तिची ट्रीटमेंट नागपूरमधील हेल्थकेअर सेंटरमध्ये सुरू होती. (Latest Marathi News)
ही महिला केमोथेरपीसारख्या कॅन्सरला झुंज देत होती. तसंच तिला इतर आजार देखील होते. त्यामुळं अनुसुया आणि तिच्या आईनं या महिलेच्या पाठीशी ठामपणे उभ राहायचं ठरवलं. अनुसूयाच्या आईने तिचे केस कापण्याचा मोठा निर्णय घेतला आणि अनुसूयाचे केस कापून या महिलेला दान करायचं ठरवलं.
खरं तर हा निर्णय घेतल्यानंतर ही चिमुकली जराही डगमगली नाही. तिनं आपले केस दान करण्याचा निर्णय घेतला. अनुसूयाने आपले केस कापून टाकले आणि या कॅन्सरग्रस्त महिलेला दिले. त्यामुळं तिला मोठा दिलासा आणि आधार मिळाला. त्यानंतर या महिलेनं तिचं कौतुकंही केलं.
केमोथेरपी करत असताना पेशन्टच्या डोक्यावरील केस गळू लागतात. त्यामुळं अनेक महिलेचं मानसिक खच्चीकरण होतं. या महिला हेअरकॅप लावून आपलं सौंदर्य जपण्याचा प्रयत्न करतात. पण याच पेशन्टला एक आधार देण्यासाठी केस दान केले जातात. त्यामुळं अनेक महिला आपलं टक्कल करून संपूर्ण केस दान करण्याचा निर्णय घेतात. पण चिमुकलीच्या या धाडसी निर्णयानं सर्वांचीच मनं जिंकली आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.