केबिनमध्ये बोलावून तरुणींशी अश्लील चाळे; महाराष्ट्रात TCS प्रकरणासारखं आणखी एक भयानक कांड

nagpur crime news : नाशिकनंतर नागपुरातही TCS प्रकरणासारखं भयानक कांड उघडीकस आलं आहे. या घटनेने नागपुरात खळबळ उडाली आहे.
nagpur news
nagpur crime newsSaam tv
Published On
Summary

नागपूरमधील एनजीओ वादाच्या भोवऱ्यात

संचालकाकडून अनेक तरुणींचे लैंगिक शोषण

पोलिसांकडून संस्था चालकाला अटक

पराग ढोबळे, साम टीव्ही

नागपूरच्या उत्तर-पश्चिम भागात लहान मुलांसाठी काम करणाऱ्या एनजीओ वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. स्वयंसेवी संस्थेच्या संचालकाने अनेक तरुणींचे लैंगिक शोषण आणि धर्मांतरणासाठी सक्तीचा प्रयत्न केल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी शनिवारी रात्री मनकापूर पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर नोंदवण्यात आली आहे. त्यानंतर संस्था चालकाला अटक करण्यात आली आहे.

रियाज काजी असे संस्था संचालकाचे नाव आहे. त्याच्या विरोधात ‘युनिव्हर्सल मल्टीपर्पज सोसायटी’च्या नावाखाली प्रकार, शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांच्या आड गैरकृत्य केल्याचा आरोप आहे. त्याच्या विरोधात २३ वर्षीय तरुणीने तक्रार नोंदवली. त्याने ऑफिसमध्ये केबिनमध्ये बोलावून अश्लील चाळे केल्याचा आरोप आहे.

सीसीटीव्ही बंद करून वारंवार गैरवर्तन, इतर तरुणींनाही चुकीच्या हेतूने स्पर्श केल्याचा आरोप आहे. संस्था चालक तरुणीच्या हालचालींवर ‘डिजिटल वॉच’ आणि बनावट सोशल मीडिया अकाउंटद्वारे नजर ठेवायचा. या संतापनजक प्रकारानंतर पीडितांसह तरुणींनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर विनयभंगासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.

nagpur news
Maharashtra News Live Update: कल्याणमधील कमलादेवी कॉलेजच्या विरोधात आखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे आंदोलन

अटक केलेल्या आरोपीला आज न्यायालयात हजर करण्यात आलं आहे. त्याला २३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणामुळे शहरात खळबळ उडाली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. नागपुरातील 'युनिव्हर्सल मल्टीपर्पज सोसायटी' या नामांकित एनजीओमध्ये काम करणाऱ्या तरुणींवर इस्लामध्ये पाळले जाणारे काही धार्मिक नियम आणि परंपरा पाळण्यासंदर्भात दबाव आणले जात असल्याचा धक्कादायक प्रकार तक्रारीतून समोर आला आहे.

एनजीओचा संचालक रियाज काजी तिथे काम करणाऱ्या 23 ते 26 वर्ष वयोगटातील काही तरुणींवर तुम्ही नमाज पठण केले पाहिजे, रोजे ठेवले पाहिजे, दुवा मागितली पाहिजे, एकमेकांना अभिवादन करताना खुदा हाफिज बोलले पाहिजे, असा दबाव आणत असल्याचा आरोप काम करणाऱ्या तरुणींनी केलाय.

nagpur news
Maharashtra News Live Update: IT क्षेत्रातील महिलांच्या शोषण प्रकरणी महिला बालकल्याण विभाग लक्ष घालणार

एनजीओचा प्रमुख असूनही तरुणींनी धार्मिक विश्वासाच्या विरोधात जाऊन परधर्मातील परंपरा पाळण्यास नकार दिल्यानंतरही वारंवार रियाज काजी सातत्याने त्या धार्मिक नियमांच्या बद्दल आग्रह धरायचा असा तक्रारकर्त्या तरुणींचा आरोप आहे. एवढेच नाही तर चार पैकी एका तरुणीने रियाज काझीने तिच्यासोबत अश्लील वागणूक केल्याचे आरोप ही केले आहेत. पोलिसांनी या प्रकरणी रियाज काजी (48 वर्ष) या एनजीओ प्रमुखाला अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com