nagpur news
nagpur news saam tv

Nagpur News: भंगारात आणलेले निकामी बॉम्बशेल कटरने कापत होते, घडलं भयानक....

नागपुरातील भंडारा रोडवर स्थित कापसी गावातील भंगार गोदामात पुलगाव येथून आणलेले निकामी बाॅम्बशेल कटरने कापत असताना झालेल्या स्फोटात एक मजूर जागीच ठार झाला आहे.
Published on

नागपूर : नागपुरातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. नागपुरातील (Nagpur) भंडारा रोडवर स्थित कापसी गावातील भंगार गोदामात पुलगाव येथून आणलेले निकामी बाॅम्बशेल कटरने कापत असताना झालेल्या स्फोटात एक मजूर जागीच ठार झाला आहे. तर एक जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. कापसी भागातील बाराद्वारी येथे हे गोदाम आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. (Nagpur News In Marathi )

nagpur news
GST Rates Hike : 'काय ते सरकार..काय तो जीएसटी..काय ती महागाई'; शिवसेना आमदाराची केंद्रावर टीका

हसनबाग येथील अब्दुल रशीद वल्द अब्दुल अजीज यांचे पारडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बाराद्वारी येथे ए. आर. ट्रेडर्स नावाने भंगाराचे गोदाम आहे. अब्दुल रशीद यांनी ३० मे २०२२ रोजी पुलगाव येथील आॅर्डनन्स फॅक्टरीतून निकामी दारूगोळा लिलावात विकत घेतला.

हा दारूगोळा कटरने कापून त्याचे पार्ट वेगळे करण्याचे काम सुरू असताना त्यातील एका बॉम्बशेलचा स्फोट झाला. त्यात ५२ वर्षीय गुड्डु भभूतलाल रतनेरे हे जागीच ठार झाले. तर सुमीत सुकरलाल मरसकोल्हे हे जखमी झाले. त्यांना दुर्गावती नगर येथील आयुष्मान या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करताहेत.

nagpur news
मोठी बातमी : माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्या मुलाच्या कारचा अपघात

मासेमारीसाठी गेलेले तरुण नदीच्या मध्यावर बेटावर अडकले,अन्...

मासेमारीसाठी गेलेले 6 तरुण पुराच्या पाण्यात नदीच्या मधोमध बेटावर अडकल्याची घटना घडली. भंडारा जिल्ह्याच्या पवनी येथील पाथरी येथे घडली आहे. त्यांच्या बचावासाठी SDRFच्या एका चमूला पाचारण करण्यात आलं. पवनी तालुक्यातील पाथरीचे काही मासेमारी करणारे इसम वैनगंगा नदीत मासेमारीकरीता गेले. त्यावेळी नदीपात्रात पाण्याची वाढ झाल्यामुळे तसेच मुसळधार पाऊस होत असल्याने सदर ६ जण पाथरी येथील नदीच्या मधोमध असलेल्या बेटावर अडकून पडले.

त्यांना बाहेर काढण्याकरीता भंडारा जिल्हा शोध व बचाव पथक प्रयत्न करीत आहे. मात्र, रात्रीचा काळोख असल्याने व नदीचे पात्रात पाणी खूप असल्याने बचाव कार्य करण्यास अडसर निर्माण होत असल्याने बचाव कार्य संथ गतीने सुरु आहे. त्यामुळे त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी SDRFचे एक चमू तैनात करण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com