GST Rates Hike : 'काय ते सरकार..काय तो जीएसटी..काय ती महागाई'; शिवसेना आमदाराची केंद्रावर टीका

जीएसटी काऊंसिलने नवे दर लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना महागाईच्या झळा सहन कराव्या लागणार आहे. या निर्णयावर शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी ट्विट करत जोरदार टीका केली आहे.
GST rates hikes
GST rates hikes saam tv
Published On

औरंगाबाद : आजपासून सर्वसामान्य लोकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. आज, १८ जुलैपासून खाद्यपदार्थांसह इतरही अनेक वस्तूंवरील जीएसटीमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे आजपासून अनेक वस्तूंसाठी अधिक रुपये आकारले जाणार आहेत. जीएसटी (GST) काऊंसिलने नवे दर लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना महागाईच्या झळा सहन कराव्या लागणार आहे. या निर्णयावर शिवसेना आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी ट्विट करत जोरदार टीका केली आहे. (Ambadas danve News In Marathi )

GST rates hikes
शिंदे-फडणवीस सरकारचा शपथविधी बेकायदेशीर ? संजय राऊतांच्या दाव्यावर मुख्यमंत्री म्हणाले...

देशात आजपासून पॅकेट बंद वस्तूंवर १८ टक्के जीएसटी आकारला जाणार आहे. याआधी बंद पाकीट वस्तूंवर केवळ ५ टक्के जीएसटी आकारला जात होता. जीएसटी कांऊसिलच्या निर्णयानंतर सर्वसामान्य लोकांना आता बंद सामानासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहे. या निर्णयामुळे शैक्षणिक वस्तू आणि आरोग्य सेवा देखील महागणार आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या महागाईमुळे सर्वसामान्य लोकांचे कंबरडे मोडले आहे, अशी भावना सर्वसामान्य व्यक्त करत आहेत. तर शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी या जीएसटी काऊंसिलच्या निर्णयाचा खरपूस समाचार घेतला आहे. देशातील वाढत्या महागाईवरून केंद्र सरकारवर टीका केली आहे.

काय ते सरकार..काय तो जीएसटी..काय ती महागाई...' आता फक्त अंगणातल्या मातीवर हा जीवघेणा कर लावायचा बाकी राहिला आहे. गरिबांवर आता माती खायची वेळ आणणार आहे हे सरकार', अशा शब्दात ट्विट करत शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com