सुवर्णपदक विजेत्या 17 वर्षीय राष्ट्रीय खेळाडूचा अपघातात मृत्यू; क्रीडा क्षेत्रावर शोककळा

Nagpur National Athlete Avani Baghel Road Accident Death: नागपूरमध्ये भरधाव दुचाकीच्या धडकेत राष्ट्रीय स्तरावरील सुवर्णपदक विजेती खेळाडू अवनी मुकेश बघेल (17) हिचा मृत्यू झाला. आरोपीला सोडल्याच्या आरोपावरून कुटुंबीयांनी डीसीपी कार्यालयासमोर आंदोलन करत न्यायाची मागणी केली.
Nagpur national athlete Avani Baghel road accident death
Nagpur national athlete Avani Baghel road accident deathsaam tv
Published On: 

पराग ढोबळे, साम टीव्ही

नागपूरमध्ये रस्ते अपघातात राष्ट्रीय खेळाडू अवनी मुकेश बघेल (वय 17) हिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. भरधाव दुचाकीच्या धडकेत अवनीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोपी दुचाकीस्वाराला पोलिसांनी सोडल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांसह खेळाडूंनी नगरसेवक आणि स्थायी समिती सदस्य वसीम खान यांच्या नेतृत्वाखाली थेट डीसीपी कार्यालयासमोर आंदोलन केले. विशेष म्हणजे, न्यायाच्या मागणीसाठी अवनीचा पार्थिव देहही रुग्णवाहिकेतून डीसीपी कार्यालयासमोर आणण्यात आला.

Nagpur national athlete Avani Baghel road accident death
सुप्रिया सुळे केंद्रात, जयंत पाटील, आव्हाड राज्याच्या मंत्रिमंडळात? राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा फॉर्म्युला ठरला?

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरमधील संघर्षनगर चौकात 11 नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास रस्ते अपघात झाला. भरधाव दुचाकीने दिलेल्या धडकेत 17 वर्षीय अवनी मुकेश बघेल हिचा मृत्यू झाला. अवनी ही सेपक टकरा या खेळातील राष्ट्रीय स्तराची खेळाडू होती. तिने राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये नागपूरचे प्रतिनिधित्व करत 7 ते 8 वेळा पदके मिळवली होती. तसेच महाराष्ट्राकडून 4 ते 5 वेळा राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होत सुवर्णपदकांना ही गवसणी घातली होती. खेलो इंडिया स्पर्धेतही तिने आपल्या खेळाची छाप पाडली होती.

Nagpur national athlete Avani Baghel road accident death
दुबईमध्ये भव्य दिवाळी सोहळा, महाराष्ट्र मंडळाच्या कार्यक्रमाला हजारो मराठी रसिकांची उपस्थिती; अवधूत गुप्तेंच्या गाण्यांची मैफील रंगली

अवनीचा राष्ट्रीय खेळाडू होण्यापर्यंतचा प्रवास संघर्षमय होता. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने तिला खेळासाठी आवश्यक शूज घेणेही कठीण होते. मात्र, अवनीने हार न मानता मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर स्वतःची ओळख निर्माण केली. तिच्या क्रीडा अ‍ॅकाडमी प्रशिक्षक आणि सहकारी खेळाडूंनीही तिला वेळोवेळी मदत केली होती. मात्र, एका अपघातामुळे तिच्या क्रीडा कारकिर्दीचा दुर्दैवी अंत झाला.

Nagpur national athlete Avani Baghel road accident death
Mhauli Ghat Road: माऊली घाटातून पंढरीचा मार्ग सुकर! ३१ वर्षांची प्रतीक्षा संपणार, वारकऱ्यांसाठी नवा रस्ता होणार तयार

अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी दुचाकीस्वाराला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते. मात्र, अवनीच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार पोलिसांनी आरोपीला रात्री ताब्यात घेतल्यानंतर पहाटे अडीच ते तीनच्या सुमारास सोडून दिले. सकाळी ही माहिती मिळताच कुटुंबीयांनी नगरसेवक वसीम खान यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर खान यांनी नंदनवन पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. संबंधित व्यक्तीला सूचना पत्र देऊन सोडण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.