Nagpur News: नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी एमआयडीसीत भीषण स्फोट; सहा कामगार जखमी

Nagpur MIDC Explosion: नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी एमआयडीसीमध्ये भीषण स्फोट झाला आहे. या घटनेमध्ये सहा कामगार जखमी झाले आहेत.
Nagpur MIDC Explosion
Nagpur MIDC ExplosionSaam Tv

Nagpur MIDC Butibori Tank Explosion

नागपूरमधून मोठी बातमी समोर येत आहे. जिल्ह्यातील बुटीबोरी एमआयडीसीच्या टॅंकमध्ये भीषण स्फोट झाला आहे. या घटनेमध्ये सहा कामगार जखमी झाले आहेत. इंडोरामा कंपनीतील टॅंक दुरुस्ती करताना हा स्फोट झाला आहे. जखमी कामगारांना तातडीने रूग्णालयात हलविण्यात (Nagpur News) आलं. जखमी कामगारांवर नागपूरामधील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.  (Latest Marathi News)

बुटीबोरी एमआयडीसीमधील (Nagpur MIDC) हा दुसरा स्फोट आहे. पहिला स्फोट गुरुवारी झाला होता. दुसरा स्फोट शुक्रवारी झालाय. इंडोरामा कंपनीतील टॅंक दुरुस्ती करताना हा स्फोट झाल्याचं सांगण्यात येत आहे. या स्फोटामध्ये सहा कामगार जखमी झाले आहेत.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

वेल्डिंगचं काम सुरु असताना स्फोट

टॅंकमध्ये वेल्डिंगचं काम सुरु असताना गुरुवारी पहिला स्फोट झाला (Nagpur MIDC Butibori Tank Explosion) होता. त्याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे. शुक्रवारी दुपारी पुन्हा वेल्डिंग काम करताना दुसरा स्फोट झाला आहे. या दोन्ही घटनेत सहा कामगार जखमी झाले आहेत.

स्फोटामध्ये जखमी झालेल्या नागरिकांवर सध्या उपचार सुरू (Nagpur MIDC) आहेत. काम सुरू असताना अचानक स्फोट झाल्यामुळे कामगारांमध्ये थोडंसं भितीचं वातावरण निर्माण झालं आहे.

Nagpur MIDC Explosion
Rewari Boiler Blast: हरयाणाच्या लाइफ लाँग कारखान्यात बॉयलरचा भीषण स्फोट; ४० हून अधिक कामगार जखमी

घरात गॅस सिलिंडरचा स्फोट

जयपूरमधील विद्याधर नगर मंदिराच्या सर्कलजवळ गॅस सिलिंडरच्या स्फोटाची घटना घडली होती. एकाच वेळी सहा गॅस सिलिंडरचा स्फोट झाला (Blast News) होता. त्यामुळे परिसरामध्ये भीषण आग लागली होती. या आगीच्या घटनेत एकाचा मृत्यू झाला होता. या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला होता. ही घटना फेब्रुवारी महिन्यात घडली होती.

गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्यामुळे परिसरामध्ये एकच गोंधळ उडाला होता. आगीची घटना घडल्यानंतर अग्निशमन (MIDC Explosion) दलाचे अग्निबंब तातडीने घटनास्थळी पोहोचले होते. सहा गॅस सिलिंडरचा स्फोट कसा झाला, याबद्दल चौकशी करण्यात होती. गॅस सिलिंडरचा अचानक स्फोट झाल्यामुळे परिसरात मोठा गोंधळ उडाला होता. 

Nagpur MIDC Explosion
Satara Blast News : सातारा शहरानजीक शासकीय कार्यालयात स्फाेट, परिसर हादरला; अधिका-यांचे ताेंडावर बाेट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com